spot_img
राजकारणमनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार? शरद पवार मोठी रणनीती...

मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार? शरद पवार मोठी रणनीती खेळण्याच्या मार्गावर

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील चेहरा वसंत मोरे यांनी काल (दि.१२) पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पुण्यातील मनसेमधील अतंर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचं सांगत त्यांनी राजीनामा दिला.

आपली पुढील राजकीय भूमिका काय असेल, याबाबत २-३ दिवसात कळवणार असल्याचं देखील वसंत मोरे यांनी सांगितलं. मात्र वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचं म्हटलं आहे.

मात्र ते कोणत्या पक्षातून लढणार की अपक्ष निवडणूक लढवणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे वसंत मोरे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मात्र वसंत मोरे शरद पवार गटात का जातील यावर एक नजर टाकूया. बारामती मतदारसंघासाठी शरद पवार यांनी नेत्यांच्या जुळजुळवीची तयारी सुरु केली आहे. त्याच रणनितीचा भाग म्हणून वसंत मोरे यांचा शरद पवार गटाला फायदा होऊ शकतो. खडकवासला, पुणे शहराचा काही भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. मनसेमध्ये असताना वसंत मोरे यांच्यावर खडकवासलामध्ये मोर्चे बांधणीची जबाबदारी होती.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना वसंत मोरे यांची मोठी मदत मिळू शकते. कारण मागील दोन निवडणुकांमधे खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना हवं तसं मतदान झालं नव्हतं. तिथे वसंत मोरे यांचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो. लोकसभा निवडणुकीतील मदतीच्या बदल्यात विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे यांना उमेदवारी देण्याचा शब्द शब्द शरद पवार गटाकडून दिला जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील वसंत मोरे यांचे स्वागत करु असं म्हटलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...