spot_img
महाराष्ट्रवैष्णवीचा मृतदेह प्रियकराने कुठे टाकला होता? प्रियकरही मरून गेला, अखेर झाडाच्या ‘L01-501’...

वैष्णवीचा मृतदेह प्रियकराने कुठे टाकला होता? प्रियकरही मरून गेला, अखेर झाडाच्या ‘L01-501’ कोडने सर्व रहस्य समोर आलं..

spot_img

नवी मुंबई / नगर सह्याद्री : मागच्या महिन्यात 12 डिसेंबर 2023 पासून बेपत्ता असणाऱ्या 19 वर्षीय मुलीचा अखेर शोध लागला असून प्रियकराने मागे ठेवलेल्या एका कोडमधून भयानक असे कृत्य समोर आले आहे.प्रियकराने आधी या 19 वर्षीय मुलीची हत्या केली व नंतर स्वत:च जीवन संपवल होत.

अखेर नवी मुंबई येथील खारघरच्या जंगलात वैष्णवी बाबर या मुलीचा मृतदेह सापडला. 24 वर्षीय आरोपी वैभव बुरुंगळेने खारघरच्या जंगलात वैष्णवीला गळा आवळून मारल्याचे समोर आले. वैष्णवी बाबर 12 डिसेंबरला कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. पण पुन्हा ती घरी आलीच नाही. त्याचदिवशी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवीच्या आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

त्याचदिवशी जुईनगर रेल्वे स्टेशनच्या रुळावर वैभव बुरुंगळेचा मृतदेह सापडला. त्याने ट्रेनसमोर उडी मारुन आपल जीवन संपवलं होतं. वैभवच्या मृत्यूची नोंद करण्यात आली व चौकशीसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली.

दरम्यान वैभव याने जीवन संपवण्याआधी त्याच्या मोबाइलमध्ये एक नोट लिहून ठेवली होती. त्यात त्याने वैष्णवीची हत्या केल्याच म्हटलं होतं. आपणही जीवन संपवत असल्याच त्याने लिहिलं होतं. मोबाइलवरच्या नोटमध्ये वैभवने ‘L01-501’ हा कोड लिहून ठेवला होता. पोलीस बरेच दिवस या कोडच रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते. कारण वैष्णवीची हत्या केली, तर तिचा मृतदेह कुठे आहे? याचा शोध पोलिसांना लागत नव्हता. अखेर ‘L01-501’ हा वनखात्याने झाडांवर लिहिलेला क्रमांक असल्याच समजलं. वनखात्याने जंगलातील झाडांना हे नंबर दिले होते. ज्या झाडावर ‘L01-501’ हा क्रमांक होता, तिथे पोलीस पोहोचले. ‘L01-501’ झाडाजवळच्या झुडुपात वैष्णवीचा मृतदेह सापडला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिल्लीचं वऱ्हाड महाराष्ट्रात येणार? राहुल गांधी अडकणार विवाहबंधनात? खा. प्रणिती शिंदे..; चर्चांना उधाण

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि महायुती व महाविकास...

सातपुते कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या लँड माफिया गुंडांवर कडक कारवाई करा

शहर भाजपाची पोलीस अधिक्षकांकडे मागणी अहमदनगर / नगर सह्याद्री - सोमवारी सायंकाळी केडगाव येथे भाजपाचे मंडल...

मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार! ‘त्याला’ निवडणुकीत धडा शिकवणार, १७ सप्टेंबर पासून..

जालना | नगर सह्याद्री:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे....

केडगाव बायपास रस्त्यावरील खुनी हल्ला करणारे काही तासातच गजाआड; कोतवाली पोलीसांची कारवाई

अहमदनगर । नगर सहयाद्री:- उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून चार जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण...