spot_img
राजकारणआमच ठरलं ! १३ खासदार पुन्हा लढणार, शिंदेंच्या 'या' शिलेदाराचा गौप्यस्फोट

आमच ठरलं ! १३ खासदार पुन्हा लढणार, शिंदेंच्या ‘या’ शिलेदाराचा गौप्यस्फोट

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी व महायुती अशी लढत होईल असेच चित्र आहे. महायुतीमध्ये जागा वाटप कसे होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच आता शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या काही विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचीही चर्चा रंगत असताना रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तयारीला लागण्याचे आदेश दिले असून शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत असं म्हटलं आहे.

लोकसभेच्या जागावाटपावर बोलताना खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, “आमचे १३ खासदार पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. या सर्व उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

माझ्या निवडणूक तयारीविषयी सांगायचं झाल्यास, माझ्या मतदारसंघातील ५८ सर्कलमध्ये ५८ मेडिकल कॅम्प घेण्यात येणार आहेत. आज चौथा मेडिकल कॅम्प झाला असून फेब्रुवारीपर्यंत ५८ मेडिकल कॅम्प पूर्ण करणार आहोत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Crime: लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात! पुण्याच्या कुटुंबाला केडगावात लुटले

अहमदनगर। नगर सहयाद्री कारमधून जाणारे कुटुंबीय लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असताना अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्राच्या...

आनंदाची बातमी आली, महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सून? हवामानशास्त्र विभागाने दिली नवी माहिती, वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री- यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मॉन्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज...

Ahmednagar Crime: धक्कादायक! मध्यरात्री मित्राच्या घरी गेला, धारदार शस्राने खून केला

अहमदनगर। नगर सहयाद्री- जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मित्राने धारदार शस्राने...

आजचे राशी भविष्य! लक्ष्मी मातेच्या कृपेने ‘या’ राशींना होणार मोठा लाभ

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य...