spot_img
अहमदनगरनीलेश लंकेंवर मतांचा पाऊस पडणार; जनसंवाद यात्रेचा शुभारंभ : पाटील, राऊत, तनपुरे,...

नीलेश लंकेंवर मतांचा पाऊस पडणार; जनसंवाद यात्रेचा शुभारंभ : पाटील, राऊत, तनपुरे, गाडे यांनी कोणाला केले टार्गेट, पहा…

spot_img

आमदार नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा मोहटादेवी गडावरून शुभारंभ
पाथर्डी | नगर सह्याद्री
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पेशवाईंच्या चढाया होतील. परंतु, दिल्लीपुढे कोणत्याही परिस्थितीत झुकायचे नाही. सर्वसामान्य जनतेचे कसब मांडण्याची कला आमदार नीलेश लंके यांच्याकडे असून सर्वसामान्य जनतेचा मतांचा पाऊस लंकेंवर पडणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सोमवार दि. १ एप्रिल रोजी नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा मोहटादेवी गडावरून शुभारंभ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह शिवसेना, काँग्रेस, आपच्या प्रमुख नेत्यांचा उपस्थितीत करण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, तुमच्यातील उत्साह प्रचंड आहे. नीलेश लंके हे सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा पिंड आहे. त्यामुळे अशा नेतृत्वाच्या माध्यमातून अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीत आवाज उठवेल. गेल्या ५ वर्षात विधानसभेत सर्व सामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याची त्याच्याकडे कला आहे. सामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर नीलेश लंके यांना संधी दिली पाहिजे.राजकारणात विचार, संस्कार महत्त्वाचे असतात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विचारांची देशाला व राज्याला गरज आहे.

इतर पक्षांनी काय केले, त्यापेक्षा १० वर्षात तुम्ही काय केले ते हिशोब सांगा. देश अराजकतेकडे, हुकुमशाही कडे चालला आहे. कोरोना काळात ५० लाख लोक मृत्युमुखी पडले. परंतु नीलेश लंके यांनी देशात, राज्यात एक नंबर काम केले. एकीकडे लाखो तरुण बेरोजगारी व इतर समस्यांचा सामना करावा लागत आहे. पेपरफुटीमुळे अनेक परिक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे डोळस होवून सामाजिक व आर्थिक परिस्थिती पहा. जातीनिहाय जनगणना का करत नाही असा सवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

अहमदनगर मतदारसंघात पैशवाईंच्या चढाया होतील, दिल्ली समोर झुकायचे नाही. स्वाभिमानाची ही लढाई सुरू आहे. जे सरदार पळाले आहेत ते पाचव्या रांगेत उभे राहतात अशी टीका नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर केली. अहमदनगर लोकसभेचा गड शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदे, पाथर्डी, कर्जत, जामखेड, शेवगाव, राहुरी, नगर या मतदारसंघातील जनतेशी जनसंवाद यात्रेदरम्यान संवाद साधणार आहेत.

यावेळी अंकुश काकडे, आमदार लहु कानडे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, राजेंद्र दळवी, नगरसेवक योगीराज गाडे, वसंतराव पवार, बाळासाहेब बोराटे, संभाजी पावले, प्रताप शेळके, योगिता राजळे, ज्ञानदेव वाफारे, कारभारी पोटघन मेजर, बंडु साबळे, महादेव सप्रे, सभापती बाबासाहेब तरटे, सतीश पालवे, राहुल झावरे, अशोक घुले, बाळासाहेब खिलारी, किरण काळे, अविनाश मगरे, उपसभापती हरिदास शिर्के, अशोक बाबर, रामराव चव्हाण, अंकुश पवार, शरद पवार, रवि काटे, सरपंच नियाज शैख, बाळासाहेब लवांडे, नगरसेवक अमित जाधव, बबन पवार, मनीषा जाधव, पूष्पाताई गर्जे, सूवर्णा धाडगे, कोमल पवार, सरपंच सुनील ढिकले, स्मितल वाबळे, आम आदमीचे किसन आव्हाड, विवेक पवार, अमर चाऊस, तय्युय शेख, इजाजभाई काझी, नंदकुमार डाळींकर, अशोक टेमकर यांच्या सह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून आमदार नीलेश लंके यांनी १ एप्रिल पासून जनसंवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून मोहटादेवी गडावरून आमदार निलेश लंके यांची जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात १५ दिवस यात्रा चालणार असून गावागावात जाऊन प्रश्न समजावून घेण्यासाठी व जनतेशी संवाद साधणार आहेत. मतदारसंघातील एका तालुक्यात सोईनुसार दोन ते तीन दिवसांच्या मुक्कामाचे नियोजन करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान आ. नीलेश लंके हे त्या त्या तालुयातच मुक्कामी राहणार असून त्यांच्या समवेतच्या कार्यकर्त्यांचीही तिथेच व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंधरा दिवसांच्या या जनसंवाद यात्रेत आ. लंके हे मतदारसंघातील नागरीकांशी संवाद साधणार असून नगर शहरातील विशाल गणपती मंदिरात या यात्रेची सांगता होणार आहे.

आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रश्न महत्त्वाचे आहेत. शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. वांबोरी चारी, पाण्याचे प्रश्न महत्त्वाचे आहे. शेतकर्‍यांचे विचार करणारे सरकार महाविकास आघाडीचे होते. परंतु सुरतेला मुजरा करण्यासाठी महायुती मध्ये गेले. आमदार फोडाफोडी करण्यासाठी ईडी सीबीआयचा वापर करत आहेत. यावेळी आमदार लहु कानडे म्हणाले, केंद्र सरकार खोटारडे असुन हे सरकार उलथून टाकण्यासाठी ही संधी आहे. पैसे सरकारचे यात्रा व इतर कार्यक्रम यांचे आहे. त्यामुळे एका राजपुत्राविरोधात ही लढाई असल्याचे आ. कानडे म्हणाले

प्रतापराव ढाकणे म्हणाले, आजची देशातील सामाजिक राजकीय परिस्थिती खराब आहे. ही पक्षाची किंवा पुढार्‍यांची नाही. अमिषाला बळी पडलो तर अजून गंभीर परिणाम भोगावे लागतील. हुकुमशाही कडे दैशाची वाटचाल असून ईडी सीबीआयचा गैरवापर करत आहेत.शेतीमालाला भाव नाही शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या हातात निर्यात आयात धोरण असताना सरकार काम करत नाही.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले, आमदार नीलेश लंके यांनी पाच महीन्यांसाठी काही कारणास्तव राजीनामा द्यावा लागला आहे. धन शक्ती विरोधात सामान्य लोकांची निवडणूक असुन सर्व सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळणार्‍या भाजपा सरकारला धडा शिकवण्यासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे म्हणाले, खासदारकीचा कानोसा घेतला तर आमदार लंके यांना पसंती आहे. महागाई शेतीमालाला भाव नाही इतर गोष्टी बाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. ४८ मतदारसंघातील संघापैंकी विक्रमी मतांनी लंके विजयी होतील असा शब्द जिल्हाप्रमुख गाडे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला.

कर्डिले ज्याच्या बरोबर त्याचा पराभव: प्रा. गाडे
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सर्व सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले ज्याच्याबरोबर व पाठीमागे आहेत, त्यांचा पराभव नक्की आहे. कारण गेल्या अनेक निवडणूकीतील हा अनुभव आहे. त्यामुळे शिवाजी कर्डिले यांना आमदार होवू देणार नाही, त्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे जोरात प्रचार यंत्रणा कार्यान्वित करून सर्व सामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना खासदार करा असे आवाहन जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले आहे.

लंकेंची उमेदवारी हुकुमशाही विरोधात: खा. संजय राऊत
मी आज जयंत पाटील यांच्या बरोबर येणार होतो. परंतु लोकसभेसाठी असलेल्या महत्वाच्या बैठकीमुळे येता आले नाही. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार नीलेश लंके हुकुमशाही, दहशती विरोधात मैदारात उतरले आहेत. नीलेश लंके हा शिवसैनिक आहे. उध्दव ठाकरे यांचे त्यांच्या वर विशेष प्रेम आहे. त्यामुळे जरी मला येता आले नाही तरी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील जनसंवाद यात्रेत मी सहभागी होणार आहेत. १६ एप्रिल रोजी माजी मंत्री आदित्य ठाकरे हे स्वतः नगर येथे समारोपासाठी येणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी दूरध्वनीद्वारे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर तालुका जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेश भंडारी, उपाध्यक्ष पदी प्रसाद कर्नावट

जैन महासंघाची तालुका कार्यकारणी घोषित पारनेर / नगर सह्याद्री - तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील...

भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये भव्य शोभायात्रा

त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की असा जयघोष / आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींच्या...

Sharad Pawar : शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवारांवर गंभीर आरोप, लायकीच काढली…

सातारा / नगर सह्याद्री - Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी राजकारण चांगलेच तापले आहे. टोकाचे...

Mp sujay vikhe patil : पंतप्रधानांनी अहमदनगरांसाठी काय केलं? खासदार विखे पाटलांनी सांगितला इतिहास…

अहमदनगर / नगर सह्याद्री Mp sujay vikhe patil : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच...