spot_img
ब्रेकिंगRashibhavishya: आजचे राशी भविष्य ! 'या' राशींसाठी खास तर काही राशींना त्रासदायक...

Rashibhavishya: आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी खास तर काही राशींना त्रासदायक आजचा दिवस

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री –
मेष राशी भविष्य

तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर, तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करतात तर, आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकतात. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावुक ही होऊ शकतात. आज जगबुडी जरी आली तरी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मिठीतून बाहेर येऊ शकणार नाही.

मिथुन राशी भविष्य

प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.

सिंह राशी भविष्य

आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. आज घरातील लोकांसोबत बोलणी करते वेळी तुमच्या तोंडातून काही शब्द निघू शकतात ज्यामुळे घरातील लोक नाराज होऊ शकतात.

तुळ राशी भविष्य

शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा करणे ठीक आहे परंतु, त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.

धनु राशी भविष्य

जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्या ही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा. आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल कारण आजचा दिवस तुमचाच आहे.

कुंभ राशी भविष्य

तुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरु करण्यासाठी चांगला दिवस आहे. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून तुम्हाला पाठिंबा मिळाल्याने आज तुम्ही उत्साहाने व आत्मविश्वासाने वाटचाल कराल.

वृषभ राशी भविष्य

आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते ज्या कारणाने तुमचे मन दुखी होऊ शकते आणि तुम्ही बऱ्याच काळ विचार करण्यात घालवू शकतात. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे! प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.

कर्क राशी भविष्य

प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते, फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे. तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही. पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात.

कन्या राशी भविष्य

घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच, पण सहजीवनाची अनुभुतीदेखील जाणवेल. तुमचा संगी तुमच्या बद्दल चांगला विचार करतो म्हणून, बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसतात त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की, तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. तुमची प्रगती आणि समृद्धी होईल असे नवे प्रस्ताव तुम्हाला नातेवाईकांकडून मिळतील. तुमचे संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.

वृश्चिक राशी भविष्य

तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडविण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. प्रेम प्रकरण थोडेस कठीण असेल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूम मध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. आज दिवस चांगला जावा असं वाटत असेल तर तुमच्या जोडीदाराचा मूड ऑफ असताना तोंडातून चकार शब्दही काढू नका.

मकर राशी भविष्य

कुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सचेत राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. आज तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद ही होऊ शकतो.

मीन राशी भविष्य

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. परंतु स्वार्थी व लगेच चिडणाºया व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते – परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...