नगर सहयाद्री टीम-
इंटरनेटच्या जमान्यात अनेकांकडे स्मार्टफोनच असतात. स्मार्टफोन वापरणार्यांना कधी-कधी अनोळखी नंबर वरून सतत कॉल येत असतात.
कॉल करणाऱ्या व्यक्ती बद्दल कोणतीही माहिती लवकर मिळत नाही. Truecaller वर नुकताच डेटा चोरीचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी Truecaller चे फिचर आपल्या स्मार्टफोनमधून अनइंस्टॉल केले आहे. अत्ता नव्या तंत्रज्ञानानुसार या दोन नव्या अॅप्सच्या मदतीने तुम्ही अनोळखी कॉलरची संपूर्ण कुंडली उघड करू शकतात.
UPI अॅपवरून
जर तुम्ही फोन पे, पेटीएम, गुगल पे किंवा इतर कोणतेही UPI अॅप वापरत असाल, तर तुम्हाला फक्त UPI अॅप ओपन करावे लागेल आणि पेमेंट ऑप्शनवर जाऊन तो नंबर टाकावा लागेल. तुम्ही हे करताच तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसेल.
टेलीग्रामअॅपवरून
अनोळखी कॉलरचे नाव जाणून घ्याण्यासाठी तुम्हाला तुमचे टेलीग्राम अॅप उघडावे लागेल आणि त्यात Truecallerjs_bot उघडून अनोळखी नंबर टाकावा लागेल. असे केल्याने, कॉलरचे सर्व तपशील तुम्हाला दिसतील.