spot_img
मनोरंजनTiger 3 : काय सांगता ! टायगर 3 सिनेमात सलमान, शाहरुख सोबत...

Tiger 3 : काय सांगता ! टायगर 3 सिनेमात सलमान, शाहरुख सोबत ‘हा’ सुपरस्टार देखील दिसणार, जबरदस्त केमिस्ट्री

spot_img

नगर सह्याद्री टीम : दिवाळी जसजशी जवळ येत आहे तसतशी टायगर 3 बद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे. हा चित्रपट सलमान खानला त्याचे जुने स्टारडम परत देईल का? त्याचे फ्लॉप सिनेमे थांबतील का? असे प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडले आहेत.

हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या स्पाय-व्हर्सचा एक भाग आहे, ज्यात टायगर, पठाण आणि वार सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे हा सिनेमा चालेल असे सर्वानाच वाटत आहे. ‘टायगर ३’मध्ये शाहरुख खान आणि सलमान खान झळकणार आहेत. पण आता या चित्रपटात आणखी एक बॉलिवूड स्टार कॅमिओ करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार वॉर चित्रपटात स्पेशल एजंट कबीरची भूमिका साकारणारा हृतिक रोशन टायगर 3 मध्येही दिसणार आहे. असे सांगितले जात आहे की आगामी काळात आदित्य चोप्राने आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटांमध्ये अशीच रणनीती आखली आहे की इतर चित्रपटांमध्ये यशस्वी झालेले स्टार आपल्या सिनेमांत घ्यायचे. मात्र, टायगर ३ मध्ये हृतिक किती काळ दाखवला जाणार हे सध्या स्पष्ट झालेले नाही. तसेच त्याचा लूक सलमान खानसोबत असेल की तो सलमान-शाहरुखसोबत दिसणार हे कोणालाच माहीत नाही.

प्रेक्षकांना सरप्राइज देण्यासाठी आदित्य चोप्राने टायगर 3 मध्ये हृतिकच्या झलकची बातमी पूर्णपणे लपवून ठेवली आहे आणि चित्रपटाच्या टीमला याबद्दल मौन बाळगण्यास सांगितले आहे. 12 नोव्हेंबरला हृतिकची एन्ट्री प्रेक्षकांना थक्क करणार आहे. यावेळी टायगर 3 मध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा मुकाबला इमरान हाश्मीने साकारलेल्या खतरनाक खलनायकशी होणार आहे. यात आता जोडीला शाहरुख आणि हृतिकही दिसतील. त्यामुळे प्रेक्षक सिनेमंकडे आकृष्ट होतील यात शंका नाही असा विश्वास निर्मात्यांना आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Crime: लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात! पुण्याच्या कुटुंबाला केडगावात लुटले

अहमदनगर। नगर सहयाद्री कारमधून जाणारे कुटुंबीय लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असताना अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्राच्या...

आनंदाची बातमी आली, महाराष्ट्रात कधी बरसणार मान्सून? हवामानशास्त्र विभागाने दिली नवी माहिती, वाचा सविस्तर..

मुंबई । नगर सहयाद्री- यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मॉन्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज...

Ahmednagar Crime: धक्कादायक! मध्यरात्री मित्राच्या घरी गेला, धारदार शस्राने खून केला

अहमदनगर। नगर सहयाद्री- जिल्ह्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मित्राने धारदार शस्राने...

आजचे राशी भविष्य! लक्ष्मी मातेच्या कृपेने ‘या’ राशींना होणार मोठा लाभ

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य...