spot_img
ब्रेकिंग...तर तुमचा सुफडा साफ होणार! जरांगे पाटील सरकारवर पुन्हा संतापले

…तर तुमचा सुफडा साफ होणार! जरांगे पाटील सरकारवर पुन्हा संतापले

spot_img

Manoj Jaraje Patil: लोकसभा निवडणुकीत कोट्यवधी मराठ्यांची भावनिक लाट येणार, मराठ्यांनी मनावर घेतले तर तुमच्या सर्वांचा सुफडा साफ करणार असा इशारा मनोज जराजे पाटील यांनी दिला आहे. ७ राज्यातील मराठे एकवटणार असून भावनेची लाट निर्माण होऊन तुमचं राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करणार, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला आहे. ते काल हिंगोलीत बोलत होते.

सरकारने दिलेलं १० टक्के आरक्षण फसवं असून ते कोर्टात टिकणार नाही. लोकसभा २०२४ निवडणुकीपूर्वी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा. कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या. अन्यथा, कोट्यवधी मराठ्यांची भावनिक लाट येणार आणि निवडणुकीत तुमचा सुपडा साफ करणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव आखला आहे, असा गंभीर आरोप देखील मनोज जरांगेंनी केला. फडणणीस यांनी जर मला एसआयटी चौकशीत गुंतवून दाखवलं. तर मी त्यांची पाठ थोपाटणार, असं आव्हान देखील जरांगे यांनी दिलं आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्ष फुटला…! तर सुनाही परक्‍या वाटू लागल्‍या का?, विखे पाटलांचा शरद पवार यांना टोला

कोल्‍हार, / नगर सह्याद्री - पक्ष फुटला तर तुम्‍हाला तुमच्‍या सुनाही परक्‍या वाटू लागल्‍या...

गावठी कट्टासह तिघे जेरबंद! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलिसांनी कारवाई करत गावठी कट्टासह व...

‘भीम उत्सव कार्यक्रमात धुडगूस घालणार्‍यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा’

अहमदनगर | नगर सह्याद्री क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती...

डॉ. विखे पाटील यांना निवडून आणण्याची तन-मन-धनाने काम करणार: चौधरी

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याची सर्वच...