spot_img
महाराष्ट्र...तर पश्चाताप होईल! मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

…तर पश्चाताप होईल! मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
आंतरवाली सराटी येथील लाठीमाराबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात माहिती दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हे मागे घेतले नाही तर फडणवीस यांना पुन्हा उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल, असे विधानही त्यांनी केले.

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. पण २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळणार हे शंभर टक्के सांगतो. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते आमच्याविरोधात जाऊ लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ नाही लागणार.

महाराष्ट्रातला मराठा काय आहे, हे त्यांना लक्षात येईल. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे लक्ष आहे. एकदा २४ डिसेंबर होऊन जाऊ द्या, मग महाराष्ट्रातला मराठा समाज काय आहे, हे त्यांना दाखवून देऊ. सरकारने काय समजायचे ते समजावे. आमचे आंदोलन शांततेतच होईल, पण सरकारला पश्चाताप करावा लागेल, अशी काहीतरी कृती करू, असेही ते म्हणाले.

भुजबळांनी मर्यादा सांभाळून बोलावे

छगन भुजबळ यांची इंदापूर येथे सभा होत आहे. याबद्दल जरांगे म्हणाले, त्यांना सभा घेण्याचा अधिकार आहे; पण त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. भुजबळ घटनात्मक पदावर आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने दंगलीची भाषा, कुर्‍हाडी-कोयत्याची भाषा करून जातीय तेढ निर्माण करू नये. मराठा आरक्षणावर त्यांनी बोलू नये, नाहीतर पुढे त्यांना दाखवून देऊ.

फडणवीसांना रोषाला सामोरे जावे लागेल

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जालन्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनाबाबत माहिती दिली. यात आंदोलकांपेक्षा पोलिस अधिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ लाठीमार केला होता, असेही ते म्हणाले होते. यावर जरांगे पाटील म्हणाले, ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते जर मूळ भूमिकेवर नाही आले, तर त्यांना मराठा काय आणि महाराष्ट्र काय, हे लक्षात येईल. कुणाचे तरी ऐकून फडणवीस यांनी भूमिका बदलली, याचा त्यांना पश्चाताप होईल. फडणवीस यांना मराठे पुन्हा उघडे पाडणार, त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात दमदार पाऊस; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात दोन दिवसांपासून रिमझिम तर काही भागात...

‘जे चुकीचे वागले त्यांना शिक्षा झाली पाहिजे’, आ. थोरात यांनी घेतली खा.लंके यांची भेट

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात | सलाईन घेत खा.लंके यांचे उपोषण सुरू अहमदनगर | नगर...

एक फोन अन आला, दोन लाख घेऊन गेला! महावितरणच्या अधिकाऱ्याचा सोबत नेमकं घडलं काय?

अहमदनगर | नगर सह्याद्री:- आयसीआयसी आय बँकेच्या नावे आलेल्या बनावट फोनला प्रतिसाद दिल्याने नोकरदार व्यक्तीच्या...

रिक्षा चालकांचा ‘तो’ प्रश्न मार्गी लावणार: आ. संग्राम जगताप

ऑटो संघटना फेडरेशनच्यावतीने आ.जगताप यांचा सत्कार अहमदनगर | नगर सह्याद्री:- रिक्षा फिटनेस, पासिंगबाबींसाठी लेटफी ही दर...