spot_img
अहमदनगरAhmednagar: नको तेच घडले, जमलेले लग्न मोडले!! युवती सोबत नेमकं घडलं काय?

Ahmednagar: नको तेच घडले, जमलेले लग्न मोडले!! युवती सोबत नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
युवतीच्या होणार्‍या पतीला मेसेज करून लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. नगर शहरातील युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (दि. २८) तोफखाना पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक गणेश चौरे (रा. शेंडी-पोखर्डी, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. फिर्यादी युवती फेब्रुवारी २०२३ पासून एका सरकारी रूग्णालयात नोकरी करत असताना त्यांची दीपक सोबत ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाल्याने ते एकमेकांशी बोलत होते, सोबत फोटोही काढले होते. दरम्यान युवतीचा सोनई (ता. नेवासा) येथील तरूणाशी विवाह जमल्याने तिने दीपक सोबत बोलणे बंद केले होते.

तरीही दीपक युवतीला, ‘प्रेम आहे, लग्न कर’ म्हणून जवळीक साधत होता. त्याने युवतीच्या होणार्‍या पतीला, ‘तू कशाला आमच्या मध्ये पडतो, तू तिच्याशी लग्न करू नकोस’, असे मेसेज करून लग्न मोडले. तसेच युवती शनिवारी (दि. २७) दिल्लीगेट परिसरातून जात असताना दीपकने तिचा हात पकडून गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात दमदार पाऊस; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर शहरासह जिल्ह्यात काही भागात दोन दिवसांपासून रिमझिम तर काही भागात...

‘जे चुकीचे वागले त्यांना शिक्षा झाली पाहिजे’, आ. थोरात यांनी घेतली खा.लंके यांची भेट

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात | सलाईन घेत खा.लंके यांचे उपोषण सुरू अहमदनगर | नगर...

एक फोन आला अन दोन लाख घेऊन गेला! महावितरणच्या अधिकाऱ्याचा सोबत नेमकं घडलं काय?

अहमदनगर | नगर सह्याद्री:- आयसीआयसी आय बँकेच्या नावे आलेल्या बनावट फोनला प्रतिसाद दिल्याने नोकरदार व्यक्तीच्या...

रिक्षा चालकांचा ‘तो’ प्रश्न मार्गी लावणार: आ. संग्राम जगताप

ऑटो संघटना फेडरेशनच्यावतीने आ.जगताप यांचा सत्कार अहमदनगर | नगर सह्याद्री:- रिक्षा फिटनेस, पासिंगबाबींसाठी लेटफी ही दर...