spot_img
अहमदनगरAhmednagar: सोशल मीडियावरची ओळख नडली, पुढे नको तिच घटना घडली!!

Ahmednagar: सोशल मीडियावरची ओळख नडली, पुढे नको तिच घटना घडली!!

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
सोशल मीडियावर झालेले संभाषण व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहितेला भेटण्यासाठी बोलविले. विवाहिता भेटण्यास गेल्यावर तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची घटना रविवारी (दि. ७) रात्री साडेनऊच्या सुमारास सावेडी उपनगरात घडली.

याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय कटावकर (रा. भिस्तबाग) याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. अक्षयसोबत फिर्यादीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. ते दोघे सोशल मीडियावर बोलत होते.

परंतु काही दिवसांपूर्वी फिर्यादी यांनी त्याच्या सोबत बोलणे बंद केले होते. दरम्यान २० डिसेंबरला अक्षय याने फिर्यादीला फोन करून भेटायला बोलविले. भेटण्यासाठी आली नाही तर आपल्यातील सोशल मीडियावर झालेले संभाषण तुझ्या नवर्‍याला पाठवून तुझा संसार मोडून तुझे जीवन बरबाद करून टाकीन, अशी धमकी दिली. फिर्यादी ७ जानेवारीला अक्षय याच्या घरी गेल्या असता अक्षयने त्यांच्या सोबत गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी; कारणही सांगितलं

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी...

आरोपी रिक्षाने आले, वाट पहिली अन् थेट फायरिंग;…वाचा नेमकं काय घडलं

मुंबई / नगर सह्याद्री - अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री...

सलमान खानसोबतची मैत्री भोवली? लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींच्या हत्येसंदर्भात पोस्ट…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे येथे...