spot_img
अहमदनगरसाखर अनेकांना 'कडवट'! खासदार विखे यांचा विरोधकांना 'तिखट' टोला

साखर अनेकांना ‘कडवट’! खासदार विखे यांचा विरोधकांना ‘तिखट’ टोला

spot_img

राहाता। नगर सहयाद्री-

मतदार संघात वेगवेगळ्या वैशिष्‍ट्यपुर्ण अशा सामाजिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे काम सातत्‍याने सुरु आहे. दिवाळी निमित्‍त साखर वाटपाचा हा उपक्रम आनंद निर्माण करण्‍यासाठी असला तरी, विखे पाटलांची साखर अनेकांना कडू लागेल असा टोला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी लगावला.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत तालुक्‍यातील विविध गावांमध्‍ये साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु आहे. राहाता शहरातही आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात खासदार विखे पाटील यांनी साखर वितरण करुन, उपस्थितांना दिपावलीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. गणेश परिसरातील ऊस उत्‍पादकांना २७०० रुपये भाव दिल्‍याबद्दल तसेच ५ कि.लो साखरेची भेट दिल्‍याबद्दल ग्रामस्‍थांच्‍या वतीने त्‍यांची लाडूतुला करण्‍यात आली.

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ.विखे पाटील म्‍हणाले की, गरीबांसाठी काम करण्‍याची शिकवण आणि संस्‍कार पद्मश्री आणि खासदार साहेबांनी दिला. तोच वारसा ना.विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली पुढे घेवून जाण्‍याचे काम विखे पाटील कुटूंबिय करीत आहे. सं‍कटात आणि आनंदात सर्वांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे यातूनच कर्तृत्‍व आणि कर्तव्‍य सिध्‍द होते.

सामाजिक उपक्रमातून राजकारण नव्‍हे तर, सामाजिक बांधिलकी आम्‍हाला जोपासायची आहे असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. मात्र ज्‍यांना साखर मिळाली त्‍यांना काहीजन आता भेटतील सुध्‍दा अशा भेटणा-यांना विखे पाटलांची साखर कडू लागेल. आम्‍ही मात्र गोड साखर दिली असल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...