spot_img
अहमदनगर'सरपंच कारखिलेच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात विरोधकांवर जोरदार टीकास्त्र'

‘सरपंच कारखिलेच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात विरोधकांवर जोरदार टीकास्त्र’

spot_img

राळेगण थेरपाळ | नगर सह्याद्री
उच्चशिक्षित शिक्षण घेऊन जनतेसाठी विकासाभिमुख योगदान देणारे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखीले यांचे कार्य मोठे असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखीले यांचा अभिष्टचिंतन सोहळा मंगळवार दि. २६ मार्च रोजी खासदार डॉ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हा परिषदचे माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी खासदार डॉ विखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार डॉ विखे पाटील यांच्या सहीत उपस्थित मान्यवरांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता जोरदार टिकाटीपन्नी केली.

मात्र युवा नेते अमोल कर्डिले यांनी आमदार नीलेश लंके यांचे नाव घेउन आम्ही लंके यांना पाठबळ दिले मात्र त्यांनी तालुक्याचे वाटोळे केले असून हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी लंके यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव होणार असून खासदार विखे पाटील पुन्हा विक्रमी मताधिक्याने विजयी होणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, माजी नगराध्यक्ष विजय औटी, भाजप नेते विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील, उद्योगपती सुरेश पठारे, दिलिप मदगे, विक्रम कळमकर, शिवाजी खिलारी, प्रितेश पानमंद, मनोज मुगंशे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल वर्पे, युवा नेते अमोल कर्डिले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजाराम एरंडे, तालुका दूध संघाचे चेअरमन दत्ता नाना पवार, संचालक दादाभाऊ वारे, आकाश मिडगुले, ज्येष्ठ नेते भरत शितोळे, प्रसाद झावरे, सचिन पाचोरे, अध्यक्ष सचिन वराळ पाटील, सोमनाथ बोरुडे, संग्राम पावडे, संदीप सालके, सोनाली सालके, राजेश गोपाळे, विलासराव हारदे, संपत सालके, मनोहर राउत, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, पत्रकार गणेश जगदाळे, पत्रकार जयदीप कारखिले, बाबाजी वाघमारे, जयसिंग हरेल, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, लोकप्रतिनिधी सुशिक्षित असणे गरजेचे आहे. तरच तालुक्याचा विकास होऊ शकतो. आज मात्र परिस्थीती वेगळी आहे. आजचे बहुतांश पुढारी आपली परिस्थीती सुधारण्यासाठी राजकारणाचा वापर करतात आणी टक्केवारीला प्रोत्साहन देत राजकारण करताना मलीदा खातात. हे जनतेच्या दृष्टीने सर्वाधिक घातक आहे. कमी शिक्षीत पुढार्‍यामुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. तालुका भरकटत चालला आहे. हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुक कुणी लढवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी लोकसभेत जाणारा लोकप्रतिनिधी शिक्षीत आहे की अशिक्षित याचा विचार जनतेने करण्याची गरज आहे. राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखीले हे आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत. उच्च शिक्षीत आहेत म्हणून राळेगण थेरपाळ परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे हे दुर्लक्षित करुण चालणार नाही. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेली पाच वर्षात हजारो कोटीची कामे चांगल्या दर्जाची विकासकामे मार्गी लागली आहेत. यावेळी त्यांनी शोले चित्रपटाचे उदाहरण सांगत आमदार नीलेश लंके यांचे नाव न घेता जोरदार टिकाटीपन्नी केली. प्रास्ताविक शशिकांत कारखिले यांनी केले. पांडुरंग कारखिले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले उपसरपंच नरेश सोनवणे यांनी आभार मानले.

सरपंच कारखिले यांचे गावांसाठी मोठे योगदान
खासदार विखे पाटील यांच्या माध्यमातून निघोज पंचायत समिती गणात कारखिले यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. शिरुर – बेल्हा या ३८ किलोमीटर रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा कारखिले व त्यांच्या सहकार्‍यांनी केला. खासदार डॉ.विखे पाटील यांनी रस्त्यासाठी ३८६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून सरपंच कारखिले यांचे गावांसाठी मोठे योगदान आहे.
– सुजित झावरे पाटील ( माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद)

सरपंच पंकज कारखिले जनतेचे आधारस्तंभ
कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेता आणी जनतेच्या सुखा दुःखात सहभागी होऊन विकासकामांसाठी योगदान देणारे युवा नेतृत्व म्हणून लोकनियुक्त सरपंच पंकज कारखीले यांची जनतेत ओळख निर्माण झाली आहे. सरपंच कारखिले व त्यांच्या सहकार्‍यांनी शिरुर-बेल्हा रस्त्यासाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. खासदार डॉ. विखे पाटील यांनी रस्त्यासाठी सर्वाधिक निधी देऊन रस्त्यावरील बहुतांश गावांची बाजारपेठ आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयुक्त असून लोकाभिमुख विकासासाठी कार्य करणारे खासदार डॉ. विखे पाटील व लोकनियुक्त सरपंच पंकज कारखीले यांच्या सारखे शेकडो कार्यकर्ते खर्‍या अर्थाने जनतेचे आधारस्तंभ आहे.
– माजी सभापती, काशिनाथ दाते

लोकप्रतिनिधींची दादागिरीची भाषा
लोकप्रतिनिधींनी पारनेर तालुक्याची वाट लावून युवकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. हुकुमशाही करीतअसून लोकप्रतिनिधींची दादागीरीची भाषा वापरीत जनतेवर दहशत निर्माण केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आमदार लंके यांनी उभे राहुन दाखवावे त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी होतील. खासदार डॉ. विखे पाटील यांनी पाच वर्षात खासदारकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून विखे पाटील कुटुबाने राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे.
– माजी नगराध्यक्ष, विजय औटी

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...