spot_img
ब्रेकिंगअहमदनगर: बचत गटाच्या महिलांना शिर्डीला का नेलं? भर दुकानात पती-पत्नी सोबत घडलं...

अहमदनगर: बचत गटाच्या महिलांना शिर्डीला का नेलं? भर दुकानात पती-पत्नी सोबत घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-

नगर तालुक्यातील एका गावात पती-पत्नी सोबत धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. रविवार दि. २९ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बाबु काळे व सुनील काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर: फिर्यादी महिला व तिचा पती रविवारी दुपारी त्यांच्या दुकानात असताना बाबु काळे व सुनील काळे दुकानावर आले. बचत गटातील महिलांना शिर्डीला का नेले, असे म्हणून फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादीच्या हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत दुकानातून बाहेर काढून दिले.

लाकडी दांडक्याने दुकानाच्या काऊंटरच्या काचा फोडून मारहाण करत तुम्हाला जे करायचे ते करा, आम्ही कुणाला घाबरत नाही, तुम्हाला पाहून घेऊ, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: डॉ. श्रीकांत पठारे

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...

‘ज्याला तडीपार केले त्यांच्या हातात गृहमंत्रीपद दिले’ शरद पवार यांचा अमित शाह यांच्यावर पलटवार

छ.संभाजी नगर । नगर सहयाद्री:- माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे...