spot_img
अहमदनगरअहमदनगर: हॉटल 'निवांत' वर राडा! १४ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण...

अहमदनगर: हॉटल ‘निवांत’ वर राडा! १४ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
हॉटेलचा दरवाजा लवकर उघडलानाही म्हणून मॅनेजर व आचारी यांना लोखंडी रॉड, बिअरच्या बाटल्या व लाकडी काठ्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील अकोळनेर येथील हॉटेल निवांतवर घडला आहे. राहुल भिकाजी पाटील व आप्पा किसन पळसकर (रा. सोनेवाडी, अकोळनेर ता. नगर) अशी जखमींची नावे आहेत.

याप्रकरणी राजू मुक्ताजी सुंबे (रा. सोनेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी (दि. २६) नगर तालुका पोलीसठाण्यात १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश तुकाराम कडुस, शरद रमेश भोसले, वैभव राजू धामणे, शुभम गुलाब धामणे, राहुल बापू कडूस, शुभम गोरख पुंड, सलिम राजू शेख, राहुल गोरख पुंड, शुभम बाळासाहेब कडुस, आकाश बापू कडुस, विशाल रावसाहेब धामणे, लखन तुकाराम काळे, वैभव दिलीप कडुस, शुभम दत्तात्रय कडुस (सर्व रा. सरोळा कासार ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हॉटेलचा दरवाजा लवकर उघडला नाही या कारणावरून आचारी राहुल भिकाजी पाटील व मॅनेजर आप्पा किसन पळसकर यांना बरील संशयित आरोपींनी जबर मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हातात लाठ्या- काठ्या, लोखंडी रॉड घेऊन हॉटेलमधील टेबल, खुच्र्यांची व बसण्यासाठी केलेल्या झोपड्यांची तोडफोड करून नुकसान केले. राहुल भिकाजी पाटील यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने डोक्यात पाठीमागील बाजुने बिअरची बाटली मारून गंभीर जखमी केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...