spot_img
अहमदनगरमंत्री विखेंच्या नेतृत्‍वाखाली ग्रामपंचायतींचा धक्कादायक निकाल ! विखेंनी दिली महत्वपूर्ण प्रतिक्रिया

मंत्री विखेंच्या नेतृत्‍वाखाली ग्रामपंचायतींचा धक्कादायक निकाल ! विखेंनी दिली महत्वपूर्ण प्रतिक्रिया

spot_img

लोणी / नगर सहयाद्री : ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेला विजय म्‍हणजे महायुती सरकारच्‍या कामावर मतदारांनी केलेले शिक्‍कामोर्तब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरु असलेल्‍या विविध योजनांच्‍या अंमलबजावणीचे मिळालेले हे प्रभावी यश आहे.

सरकार आणि संघटना यांच्‍यातील समन्‍वयाने सुरु असलेल्‍या विकासात्‍मक कामाला मतदारांनी साथ दिली असल्‍याची प्रतिक्रीया महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली राहाता तालुक्‍यातील ९ ग्रामपंचायतींमध्‍ये जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

संगमनेर तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतींमध्‍ये आणि श्रीरामपूर तालुक्‍यातील ७ ग्रामपंचायतींमध्‍ये विजयी झालेल्‍या उमेदवारांचे अभिनंदन विखे यांनी केले. ते म्हणाले , आमचे नेते आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागात केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांचा लाभ शासन आपल्‍या दारी या उपक्रमातून पोहोचविण्‍याचे काम निरंतरपणे सुरु आहे.

समाजातील सर्व घटकांशी या उपक्रमातून होत असलेला सुसंवाद याचे यश या निवडणूकीत दिसून आले आहे. राज्‍यात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली महायुतीचे सरकार आल्‍यानंतर ग्रामीण भागाच्‍या विकासाला मोठी गती मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या महत्‍वकांक्षी जलजीवन मिशन योजनेचे काम गावागावात सुरु झाले आहे.

केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या योजनांचा लाभही थेट लाभार्थ्‍यांना मिळत असल्‍याचा परिणाम या निवडणूकीत पाहायला मिळाला. तसेच राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातूनही ग्रामीण भागाच्‍या विकासाला निधी उपलब्‍ध होत आहे. ग्रामपंचायत निवडणूकी मिळालेले यश म्‍हणजे सरकारच्‍या कामावर एक प्रकारे मतदारांनी विश्‍वास व्‍यक्‍त केला असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले. भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातून विविध योजनांचा पाठपुरावा कार्यकर्त्‍यांच्‍या होत असतो. सरकार आणि संघटना यांच्‍यातील समन्‍वयाचा योग्‍य परिणाम या निवडणूकीच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट झाला असून, राहाता तालुक्‍यातील विकासाला कधीही निधी कमी पडू दिला नाही.

राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून शिर्डी मतदार संघाच्‍या विकासाला उपलब्‍ध होत असलेल्‍या निधीबद्दल त्‍यांनी मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्र्यांचे आभार मानून विकासाची प्रक्रीया आणि शासन योजनांची अंमलबजावणी यशस्‍वीपणे होत असल्‍यामुळेच सर्व योजनांचे लाभार्थी हे शिर्डी मतदार संघात सर्वाधिक असल्‍याचे विखे पाटील यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! लक्ष्मी मातेच्या कृपेने ‘या’ राशींना होणार मोठा लाभ

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य...

धक्कादायक! मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी असा अडकला जाळ्यात…

अहमदनगर / नगर सह्याद्री मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून...

Politics News: आमदार राम शिंदे यांनी सांगितले खा. सुजय विखे यांचा विजयाचे गणित! ‘इतक्या’ लाखांचे मताधिक्यक मिळणार, पहा..

अहमदनगर | नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या, तथाकथित सर्व्हेही झाले होती....

खुशखबर! मान्सून ‘या’ तारखला केरळमध्ये धडकणार

पुणे | नगर सह्याद्री येत्या ५ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शयता आहे. यासाठी लवकरच...