spot_img
अहमदनगरधक्कादायक! 'आरबाज' चा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धक्कादायक! ‘आरबाज’ चा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
शहरात गुन्हेगारीचा आलेख पुन्हा वर चढला आहे. नराधमाने एका शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोबत काढलेले फोटो घरच्यांना दाखविण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात अत्याचार, पोक्सो, विनयभंग, अपहरण कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरबाज चाँदखान पिंजारी(रा. सौरभनगर, भिंगार) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: सोमवारी (दि. १८) दुपारी एकच्या सुमारास मुलीचा पेपर संपल्यानंतर मुलगी तिच्या शाळेतून घरी जात असताना आरबाज याने तिचा पाठलाग केला. मुलीने बोलण्यास व भेटण्यास नकार दिल्यानंतर, ‘तु मला भेटली नाहीस, तर मी तुझ्या घरच्यांना भेटून आपल्या दोघांचे प्रेमसंबंध आहेत, असे खोटे सांगून तुझी बदनामी करील, तसेच तुझे माझ्याकडे असलेले मोबाईलमधील फोटो मी तुझ्या घरच्यांना दाखविल’, अशी धमकी दिली.

त्यानंतर तिला आरबाज याने बळजबरीने दुचाकीवर बसून फुलसौंदर चौकजवळील लक्ष्मी हॉटेल येथे नेले. दरम्यान मुलगी हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिने त्याठिकाणी आरडाओरडा करून तेथे असलेल्या नागरिकांना आरबाज त्रास देत असल्याचे सांगितले. त्या हॉटेलमधील तिघांनी आरबाज व मुलीला कोतवाली पोलीस ठाण्यात हजर केले. सुमारे एक वर्षापूर्वी संभाजीनगर रस्त्यावरील एका लॉजवर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुजय विखेेंचे नरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपिस्थितीत केला अर्ज दाखल, कोण कोण होते उपस्थित पहा

अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील...

पारनेर तालुका जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेश भंडारी, उपाध्यक्ष पदी प्रसाद कर्नावट

जैन महासंघाची तालुका कार्यकारणी घोषित पारनेर / नगर सह्याद्री - तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील...

भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये भव्य शोभायात्रा

त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की असा जयघोष / आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींच्या...

Sharad Pawar : शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवारांवर गंभीर आरोप, लायकीच काढली…

सातारा / नगर सह्याद्री - Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी राजकारण चांगलेच तापले आहे. टोकाचे...