spot_img
महाराष्ट्रअजित पवार गटाला धक्का! राष्ट्रवादीचा 'बड्या' नेत्याचा राजीनामा; साहेब 'तो' डाव टाकणार

अजित पवार गटाला धक्का! राष्ट्रवादीचा ‘बड्या’ नेत्याचा राजीनामा; साहेब ‘तो’ डाव टाकणार

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोनावणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे.

तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे.ते अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर आज (२० मार्च) दुपारी साडेचार वाजता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. बीडमधील अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करतील. बजरंग सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात होते. पुण्यात त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. २०१९ सालच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

त्यावेळेस धनंजय मुंडे हे सोनवणे यांच्यासोबत होते. मात्र आता महायुतीमधील सगळी चित्रं बदलल्याचं दिसत आहे. आता पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना जिंकून देण्याचं आश्वासन हे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे हे कुठेतरी नाराज होते. आणि त्यांची हीच नाराजी पक्षबदलासाठी कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे. अखेरीस ते अजित पवार गट सोडून आता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...