spot_img
राजकारणशिवसेना कार्यालयावरून शिंदे-ठाकरे गटाचे शिवसैनिक भिडले, एकमेकांना मारहाण

शिवसेना कार्यालयावरून शिंदे-ठाकरे गटाचे शिवसैनिक भिडले, एकमेकांना मारहाण

spot_img

सांगली / नगर सह्याद्री : शिवसेनेमध्ये फूट फडल्यानंतर राज्यातील शिवसैनिकही विभागले गेले. सध्या दोन्ही गट शहरातील पक्षाच्या शाखा, कार्यालयावर दावा सांगत आहेत. त्यामुळे काही भागात कार्यकर्त्यांमध्ये वादविवादही दिसत आहे. आता

आणखी एक धक्कायक प्रकरण समोर आले आहे. सांगलीत पक्षाच्या कार्यालयावरून दोन्ही गट एकमेकांविरोधात भिडले आहेत. या वादामुळे परिसरातील राजकीय वातावरण तापलं आहे.शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा केला गेला व यातून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करण्यापर्यंतचे प्रकार घडले आहेत.

शहरातील किल्ला भाग जुना या ठिकाणी असणारी जागा 1989 साली पटवर्धन सरकार यांनी मिरज शहर शिवसेनेला भाडेतत्त्वावर दिली होती. उताऱ्यावर शिवसेना शहर प्रमुख म्हणून नोंद आहे. या उताऱ्याच्या आधारे उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी जागेवर हक्क असल्याचा दावा केला. त्यांनी पत्र्याचे शेड उभे करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालय उघडून काम सुरू केले.

यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण रजपूत यांनीही या जागेवर हक्क सांगितला. त्यांनी पत्र्याचे शेड काढण्यासाठी महापालिका प्रशासनाला तक्रार दिली व त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाकडून सदर जागेच्या ठिकाणी धाव घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे आणि किरण सिंह रजपूत यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. एकामेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...