spot_img
महाराष्ट्रशिंदे गटाच्या आमदारांचा गुवाहाटीत हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, सर्वात मोठा...

शिंदे गटाच्या आमदारांचा गुवाहाटीत हॉटेलमध्ये एअर हॉस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, सर्वात मोठा गौप्यस्फोट

spot_img

मुंबई : नगर सह्याद्री : राजकारणात विविध गौप्यस्फोट सुरूच असतात. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. परंतु आता सर्वात मोठा गौप्यस्फोट करण्यात आलाय. “शिंदे गटाच्या आमदारांनी गुवाहाटीमधील एअर हॉस्टेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आमदारांनी दारुच्या नशेत झिंग होऊन सर्व गोष्टी केल्या”, असा आरोप असीम सरोदे यांनी केला. तसेच शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाणदेखील करण्यात आली, असा धक्कादायक दावा असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. असीम सरोदे यांनी धाराशिवमधील ‘निर्भय बनो’ सभेत याबाबतचे आरोप केले आहेत.

दुसरीकडे असीम सरोदे यांच्या या आरोपांना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. “महापत्रकार परिषदेतच कळालं सरोदे ठाकरे गटाचे पुढारी आहेत”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. “गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले. त्यांना आठ किलोमीटर गेल्यानंतर पकडून आणण्यात आलं. त्यांना गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली?”, असा सवाल असीम सरोदे यांनी केला.

तसेच “गुवाहाटीला जिथे थांबले होते तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी काही रुम्स बुक केलेल्या होत्या. त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता. जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. एअर होस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला? हे महाराष्ट्राने शोधलं पाहिजे. दारुच्या नशेत झिंगत असलेल्या आमदारांनी या गोष्टी केल्या. हा पैशांचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही”, असं असीम सरोदे म्हणाले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दिल्लीचं वऱ्हाड महाराष्ट्रात येणार? राहुल गांधी अडकणार विवाहबंधनात? खा. प्रणिती शिंदे..; चर्चांना उधाण

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि महायुती व महाविकास...

सातपुते कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या लँड माफिया गुंडांवर कडक कारवाई करा

शहर भाजपाची पोलीस अधिक्षकांकडे मागणी अहमदनगर / नगर सह्याद्री - सोमवारी सायंकाळी केडगाव येथे भाजपाचे मंडल...

मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार! ‘त्याला’ निवडणुकीत धडा शिकवणार, १७ सप्टेंबर पासून..

जालना | नगर सह्याद्री:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे....

केडगाव बायपास रस्त्यावरील खुनी हल्ला करणारे काही तासातच गजाआड; कोतवाली पोलीसांची कारवाई

अहमदनगर । नगर सहयाद्री:- उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून चार जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण...