spot_img
अहमदनगरशेंडी बायपास अवैध धंद्यांचे आगार! मध्यरात्री तीेन ते सकाळी सहा खुलेआम दरोडा

शेंडी बायपास अवैध धंद्यांचे आगार! मध्यरात्री तीेन ते सकाळी सहा खुलेआम दरोडा

spot_img

‘नगर सह्याद्री’ च्या वृत्तानंतर पोलिस प्रशासन खडबडून जागे | शेंडी बायपास अवैध धंद्यांचे आगार | आता ‘त्यांनी’ दरोड्याची वेळच बदलवली
अहमदनगर | नगर सह्याद्री
पोलिस असल्याचा बनाव करत औरंगाबाद रस्त्यावर वाहन चालकांना खुलआम लुटणार्‍या टोळीच्या कृत्याचा पर्दाफाश ‘नगर सह्याद्री’ने केल्यानंतर या तोतया पोलिसांनी आता त्यांची वेळ बदलून टाकली आहे. मध्यरात्री तीन ते सकाळी सहा या साखर झोपेच्या वेळेत वाहन चालकांवर दरोडे टाकणार्‍या या टोळीने आता वाहन चालकांना मारहाण करण्यापर्यंत मजल गाठली आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना आता वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांनी साकडे घातले आहे. मध्यरात्रीच्या साखर झोपेत सारे असताना होत असलेली ही दरोडेखोरी पोलिस दलातील वरिष्ठांच्या आशीर्वादाने नक्कीच नसेल. आता पहाटेच्या मुहूर्तावर या भामट्यांना पकडले जाईल असा भाबडा आशावाद वाहन चालकांमधून व्यक्त होत आहे.

औरंगाबाद रस्त्यावर शेंडी बायपास रस्त्याच्या मार्गाने वडगावगुप्ता मार्गे मनमाड- कल्याण आणि पुण्याकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहने नगर शहरात येऊ नये यासाठी शेंडी चौकात सिग्नल आणि बॅरेकेटस लावण्यात आले आहेत. याशिवाय तोंडाला मास्क लावलेला परंतू अंगात खाकी पँट आणि शर्टच्या वरुन निळे जर्किन घातलेले, हुबेहुब पोलिसच दिसेल असा पेहराव केलेल्या व्यक्ती असतात. पाहताक्षणी हे पोलिसच असावेत असा भास होतो. दरम्यान, याबाबतचे वृत्त दि. १९ मार्च रोजीच्या अंकात प्रसिद्ध होताच या भामट्यांनी आपली वेळ बदलून टाकली. आता ही टोळी पहाटेच्या सुमारास येथे सक्रिय झाली आहे. वाहन चालकांना मारहाण करून त्यांच्याकडून वसुली करणार्‍या व खाकीला बदनाम करणार्‍या या टोळीला पकडण्याची मागणी होत आहे.

गुन्हे शाखेला का सापडेना हे दरोडेखोर?
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा दरारा आहे. कोणत्याही गुन्ह्याची उकल चुटकीसरशी करणार्‍या या शाखेला शेंडी बायपास चौकातील हे तोतया पोलिस आणि वाहन चालकांना राजरोस लुटण्याची त्यांची पद्धत दिसून येत नसल्याबद्दल आता आश्चर्य व्यक्त होत आहे. हायवे-वर ठाण मांडून आणि पोलिसांचा हुबेहुब पेहराव करून लुटणार्‍या या दरोडेखोरांना गुन्हे शाखेतील कोणाचे आशीर्वाद तर नाहीत ना असा प्रश्न आता नव्याने चर्चेत आला आहे.

बसस्थानकाजवळील प्रवासी वाहतुक करणार्‍यांकडून होतेय राजरोस वसुली?
नगरच्या मध्यवर्ती बसस्थानक असणार्‍या माळीवाडा बसस्थानक परिसरातून अहोरात्र प्रवासी वाहतूक केली जाते. लांबपल्ल्याच्या खासगी बसेस आणि त्यातून होणारी प्रवासी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात काही ट्रॅव्हल्स एज़ंट आणि त्यांची कार्यालये देखील आहेत. या परिसरातून प्रवाशांची लुटमार करणार्‍या घटनाही नित्याच्याच! बसस्थानक परिसरात भुरटे चोरटेही नित्याचेच! कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या बसस्थानकासह पुणे बसस्थानक परिसरातून खासगी वाहन चालकांकडून वसुली केली जाते. गुन्हेगारी थोपविण्याचे, त्याला अटकाव करण्याचे काम ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून त्याबाबत काम न होता वाहन चालकांकडून होणारी वसुली आता नगरकरांच्या चेष्टेचा विषय झाला आहे. दरम्यान, याबाबत आता वरिष्ठांनी लक्ष घालावे आणि खाकीची बदनामी थांबवावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...