spot_img
आरोग्यउसाचा रस 'या' समस्यांवर रामबाण उपाय! पहा रस पिण्याची योग्य वेळ व...

उसाचा रस ‘या’ समस्यांवर रामबाण उपाय! पहा रस पिण्याची योग्य वेळ व पद्धत

spot_img

नगर सहयाद्री टीम-
आपल्याकडे उसाचा रस खूप पसंद केला जातो. उन्हाळ्याच्या हंगामात उसाच्या रसाचे अनेक स्टॉल बाजारात पाहायला मिळतील. उसाचा रस आपल्याला अनेक आरोग्य फायदे देतो. उसाच्या रसाचे सेवन करून गंभीर समस्येपासून सुटका मिळवू शकतात. पण उसाच्या रसाचे सर्व फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला ते एका विशिष्ट वेळी प्यावे लागेल.

उसाचा रस पिण्याची योग्य वेळ : देशातील सुप्रसिद्ध पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांनी उसाचा रस पिण्याचे फायदे सांगितले. ती म्हणते की तुम्ही ताजे काढलेल्या उसाचा रस घ्यावा. दुपारपूर्वी ऊसाचा रस प्या आणि आठवड्यातून किमान तीन वेळा तुम्ही त्याचे सेवन करावे. यासोबतच, उसाच्या रसाचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही बसून त्याचे सेवन करावे.

उसाच्या रसाचे फायदे

– रुजुता दिवेकर यांच्या मते, जे पुरुष वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त आहेत आणि शुक्राणूंची गुणवत्ता कमी आहे, त्यांनी उसाचा रस प्यावा. कारण हे फर्टिलिटी बूस्टर आहे.

– उसाचा रस स्त्रियांना मासिक पाळीपूर्वीचे ब्लड स्पॉटिंग आणि क्रैंप पासून देखील आराम देते आणि नवीन मातांसाठी स्तनपान वाढवते.

– उसाच्या रसाचे सेवन केल्याने पोट फुगणे आणि थकवा येण्याची समस्या दूर होते.

– पोषणतज्ञांच्या मते, हा फायदेशीर रस यकृत आणि मूत्रपिंडाचे कार्य सुधारतो.

– त्याचबरोबर मुरुमे आणि डोक्यातील कोंडा या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही याचे सेवन केले पाहिजे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...