spot_img
राजकारणभाजप आमदाराला रोखण्यासाठी रोहित पवारांचे अजित दादांना आवाहन ! म्हणाले,..

भाजप आमदाराला रोखण्यासाठी रोहित पवारांचे अजित दादांना आवाहन ! म्हणाले,..

spot_img

पुणे / नगर सह्याद्री : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत आहेत. भाजप आमदार टी राजा यांच्या कोल्हापूर येथील नियोजित कार्यक्रमावरून रोहित पवार यांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे. तसेच त्यांनी टी राजा यांचा कार्यक्रम रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही केले आहे.

पवारसाहेबांना सोडून तुम्ही प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे, असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापूरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती असं रोहित पवार यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलं आहे. याबाबत रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट केली आहे.

अजितदादांना टोला, भाजपवर हल्लाबोल
अजितदादा, आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली, परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे.

मात्र कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापूरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे, अशा भावना रोहित पवार यांनी मांडल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...