spot_img
अहमदनगरधक्कादायक! वाहनचालकांवर बनावट खाकीवर्दीचा दरोडा

धक्कादायक! वाहनचालकांवर बनावट खाकीवर्दीचा दरोडा

spot_img

पोलिस अधीक्षकांना वाकुल्या | स्थानिक गुन्हेशाखा, वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍यांना चोपण्याची भाषा करत राजरोस वसुली
अहमदनगर | नगर सह्याद्री
खाकी वर्दी दिसली की अनेकांना घाम फुटतो! तीच खाकी वर्दी घालून औरंगाबाद रस्त्यावरील शेंडीबायपास चौकात वाहन चालकांना दिवसाढवळ्या लुटणारी टोळी गेल्या अनेक महिन्यांपासून सक्रिय झाली आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून वसुली करणार्‍या या टोळीला अटकाव करण्याची हिंम्मत पोलिसांमध्ये नाही! हिम्मत असेल तर ही अनधिकृत वसुली का थांबली जात नाही असा दुसरा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. खाकी वर्दीचा सन्मान राखत त्यातून त्या वर्दीची उंची वाढविण्यासाठी कार्यतत्पर असणार्‍या पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना देखील ही टोळी वाकुल्या दाखवत आहे. या टोळीला अटकाव करण्यास गेलेेल्या पोलिस कर्मचार्‍यांना थेट चोपून काढण्याची भाषा केली जात आहे. दिवसाढवळ्या दरोडा टाकणार्‍या या तोतया पोलिसांना कोणाचे आशीर्वाद आहेत हे शोधून काढण्याचे काम आता दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनाच करावे लागणार आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, नगर- औरंगाबाद रस्त्यावर शेंडी बायपास रस्त्याच्या मार्गाने वडगावगुप्ता मार्गे मनमाड- कल्याण आणि पुण्याकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहने नगर शहरात येऊ नये यासाठी शेंडी चौकात सिग्नल आणि बॅरेकेटस लावण्यात आले आहेत. याशिवाय तोंडाला मास्क लावलेला परंतू अंगात खाकी पँट आणि शर्टच्या वरुन निळे जर्किन घातलेले, हुबेहुब पोलिसच दिसेल असा पेहराव केलेल्या व्यक्ती असतात. पाहताक्षणी हे पोलिसच असावेत असा भास होतो. अनेकदा या रस्त्याने महसूल आणि पोलिस विभागातील वरीष्ठ अधिकारी जातात त्यावेळी हे बोगस पोलिस त्यांना पोलिसांच्याच स्टाईलने सॅल्युट ठोकताना दिसतात.

शेंडी चौकातील दुकानदार आणि हॉटेल चालकांकडे याबाबत ‘नगर सह्याद्री’ंच्या टीमने चौकशी केली असतात या चौकात तीन- चार पोलिस कर्मचारी हे गेल्या वर्ष- दीड वर्षांपासून ड्युटी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची याच चौकात ड्युटी असून ते वाहतूक कोंडी होणार नाही यासह काही वाहन चालकांकडून वसुलीचे कामही करत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या चौकात महामार्ग पोलिसांकडून कोणत्याही कर्मचार्‍याची नियुक्ती करण्यात आली नसल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना दिली. महामार्ग पोलिसांचे हे कर्मचारी नसल्याचे स्पष्ट झाल्याने हे कर्मचारी नगर शहर वाहतूक शाखेचे आहेत काय याबाबत चौकशी केली असता त्यांनी देखील हे कर्मचारी आमचे नाहीत असे सांगितले. हा चौक एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्या पोलिस ठाण्यात चौकशी केली असता त्यांनी देखील हे कर्मचारी आमचे नाहीत असे स्पष्ट केले. गुन्हे शाखेकडे चौकशी केली असता त्यांनी देखील हे कर्मचारी आमचे नाहीत असे स्पष्ट केले.

नगर जिल्हा पोलिस दल आणि महामार्ग पोलिस यांच्या पैकी कोणाचेच कर्मचारी नसतानाही गेल्या दीड- दोन वर्षांपासून या बोगस व्यक्ती पोलिस असल्याचे भासवून वाहन चालकांची लुट करत आहेत. या चौकात खराखुरा पोलिस गेलाच तर त्याला चोपून काढण्याची भाषा करण्यापर्यंत या तोतया पोलिसांची मजल गेली आहे. एकूणच पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे सारे होत असताना व हा प्रकार एक- दोन दिवस नव्हे तर एक- दीड वर्षांपासून चालू असताना पोलिसांना या तोतयांच्या कारनाम्याची माहिती मिळू नये यातच आश्चर्य आहे. या संपूर्ण प्रकरणात आता दस्तुरखुद्द पोलिस अधीक्षकांनीच लक्ष घालण्याची मागणी वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर तालुका जैन महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेश भंडारी, उपाध्यक्ष पदी प्रसाद कर्नावट

जैन महासंघाची तालुका कार्यकारणी घोषित पारनेर / नगर सह्याद्री - तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील...

भगवान महावीर जयंतीनिमित्त नगरमध्ये भव्य शोभायात्रा

त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की असा जयघोष / आनंदधामच्या प्रांगणात साधूसाध्वीजींच्या...

Sharad Pawar : शिंदे गटाच्या आमदाराचा शरद पवारांवर गंभीर आरोप, लायकीच काढली…

सातारा / नगर सह्याद्री - Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी राजकारण चांगलेच तापले आहे. टोकाचे...

Mp sujay vikhe patil : पंतप्रधानांनी अहमदनगरांसाठी काय केलं? खासदार विखे पाटलांनी सांगितला इतिहास…

अहमदनगर / नगर सह्याद्री Mp sujay vikhe patil : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच...