spot_img
अहमदनगरAhmednagar News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिचरणी लीन

Ahmednagar News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिचरणी लीन

spot_img

Ahmednagar News : अहमदनगर/ नगर सह्याद्री : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू [President Draupadi Murmu] यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.

श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. श्री शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य! लक्ष्मी मातेच्या कृपेने ‘या’ राशींना होणार मोठा लाभ

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य...

धक्कादायक! मित्रानेच केला मित्राचा खून; आरोपी असा अडकला जाळ्यात…

अहमदनगर / नगर सह्याद्री मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून...

Politics News: आमदार राम शिंदे यांनी सांगितले खा. सुजय विखे यांचा विजयाचे गणित! ‘इतक्या’ लाखांचे मताधिक्यक मिळणार, पहा..

अहमदनगर | नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत अनेक अफवा पसरवल्या गेल्या होत्या, तथाकथित सर्व्हेही झाले होती....

खुशखबर! मान्सून ‘या’ तारखला केरळमध्ये धडकणार

पुणे | नगर सह्याद्री येत्या ५ दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शयता आहे. यासाठी लवकरच...