spot_img
अहमदनगरAhmednagar: सराईत गुन्हेगाराची दरोड्याची तयारी! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 'अशा' ठोकल्या बेड्या

Ahmednagar: सराईत गुन्हेगाराची दरोड्याची तयारी! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ‘अशा’ ठोकल्या बेड्या

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात १४ चोरी व दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल असलेली सहा दरोडेखोरांची टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश असून, ते वाळुंज परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत होते.

साईनाथ तुकाराम पवार (वय २२), आकाश गोरख बर्डे (वय २८), विशाल पोपट बर्डे (वय १८), नवनाथ तुकाराम पवार (वय २७), अमोल दुर्योधन माळी (वय १८) व कुरणवाडी (ता. राहुरी) येथील अल्पवयीन आरोपी अशा सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ८ जानेवारीला रात्री नगर-सोलापूर रोडवरील वाळुंज शिवार, पारगांव फाटा येथे ५ ते ६ जण दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात दबा धरुन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोनि दिनेश आहेर यांनी पथकाला सूचना दिल्यानंतर पथकाने छापा टाकला. यावेळी अंधारात झुडपाच्यामागे काही जण दबा धरुन बसलेले होते. पथकाची चाहूल लागताच ते पळाले. पथकाने त्यांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.

आरोपींकडून २ तलवारी, १ टामी, ४ मोबाईल, नायलॉन दोरी, लाकडी दांडके व मिरचीपूड असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि हेमंत थोरात, सफौ दत्तात्रय हिंगडे, पोहेकॉ सुनील चव्हाण, बापुसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, पोना रविंद्र कर्डीले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, पोकॉ सागर ससाणे, प्रमोद जाधव व चासफौ उमाकांत गावडे यांनी ही कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...