spot_img
ब्रेकिंगParner News: एक कोटीची वाळू चोरी! 'यांच्यावर' गुन्हा दाखल ‘दैनिक नगर सह्याद्री’...

Parner News: एक कोटीची वाळू चोरी! ‘यांच्यावर’ गुन्हा दाखल ‘दैनिक नगर सह्याद्री’ च्या वृत्तामुळे पोलखोल’

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री-
तालुक्यातील मांडवे खुर्द येथील मुळा नदीपात्राच्या कडेला असणारा खाजगी मालकीच्या गट क्रमांक ६१७ मधून तब्बल १ कोटी रुपयांची १२९७ ब्रास वाळूची चोरी झाल्याचा पंचनामा महसूल विभागाच्या पथकाने केला आहे. त्यामुळे कामगार तलाठी दत्तात्रय शिंदे यांच्या फिर्यादीवरून महसूल विभागाने खडकवाडी व मांडव्याच्या ५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. तर पारनेर तालुक्यातील मुळा नदीपात्रातून वाळु तस्करीचे पितळ उघडे पडले आहे.

महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्याशेजारील मुळा नदीपात्रातून ही वाळू चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत तलाठी दत्तात्रय झुंबर शिंदे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, या फिर्यादीनुसार पारनेर पोलिसांनी प्रवीण सोपान गागरे, शुभम रेवजी गागरे व विमल रामचंद्र गागरे (रा. मांडवे खुर्द) तसेच दत्तात्रय रोडे व सचिन शिंगोटे (रा. खडकवाडी ता. पारनेर) यांच्या विरोधात पारनेर पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत या पाचही जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मांडवे खुर्द येथील विमल रामचंद्र गागरे यांच्या शेत जमिनीतील गट क्रमांक ६१७ मधून तब्बल १२९७ ब्रास वाळूची चोरी झाली आहे. बाजारभावा प्रमाणे या वाळूची किंमत तब्बल १ कोटी १ लाख १६ हजार ६०० रूपये होते. दरम्यान पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे यांनी या वाळू चोरीचे सोशल मीडियावर आलेल्या फुटेज नुसार संबंधित तलाठी दत्तात्रय शिंदे यांना गुन्हा नोंदवण्यासाठी सांगितले होते. या गुन्ह्याचा पुढील तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

‘नगर सह्याद्री’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी पारनेर तालुयातील मुळा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू तस्करी होत असल्याचे वृत्त दैनिक नगर सह्याद्रीने मुळा नदी पात्रातील पुरावानिशी सचित्र प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महसूल विभागाने शिवार पाहणी करत असताना मांडवे खुर्द मध्ये अवैंध वाळू उपसा उघड झाला असून दैनिक नगर सह्याद्रीच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मांडव्यात शिवारपाहणीत वाळू तस्करी उघड: कामगार तलाठी दत्तात्रय शिंदे
पळशीचे मंडल अधिकारी अशोक डोळस यांच्यासह महसूल विभागाचे पथक हे मुळा नदी परिसरात शिवार पाहणी करत असताना मांडले खूर्द येथील खाजगी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात असल्याचा खुणा आढळल्या. त्यानुसार यासंबंधी माहिती तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना देताच तहसीलदार सौंदाणे यांच्या आदेशानुसार पळशीचे मंडलाधिकारी अशोक डोळस, कामगार तलाठी दत्तात्रय शिंदे, कामगार तलाठी निलेश पवार, कामगार तलाठी रविंद्र शिरसाट, कामगार तलाठी शरदचंद्र नांगरे यांना या अवैध वाळू उपसाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल विभागाचे पथक शिवार पाहणी करत असताना अवैंध वाळू उपसा ताज्या खुना व ऊस तोडणी कामगारांकडे चौकशी केली असता ही विधवा महिलांचे शेत जमीन असुन संगमनेर रहिवासी असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली.परंतु स्थानिक ५ जणांनी संगनमताने हा अवैध वाळू उपसा केला असून त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वासुंदा गावचे कामगार तलाठी दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘मांडओहोळ’ने गाठला तळ! पाणी उपसा करणाऱ्यांनो सावधान, प्रशासनाने दिला ‘हा’ इशारा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात गावागावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली असून...

महिला बचत गटांसाठी खासदार विखे पाटलांचे मोठे गिफ्ट; वाचा सविस्तर

पाथर्डी | नगर सह्याद्री महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून व सक्षम करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील...

बैलगाडा प्रेमींना धक्का! पंढरीशेठ फडके यांचं निधन

मुंबई। नगर सहयाद्री प्रसिद्ध असलेले बैलगाडा शर्यत शौकिन आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष 'गोल्डमॅन' पंढरीशेठ फडके...

अबब! पुन्हा पेपर फुटला; विद्यार्थी संतप्त

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...