spot_img
ब्रेकिंगसंसदेत घुसखोरी प्रकरण! 'ऐवढे' कर्मचारी निलंबित, आरोपीचे वडील म्हणाले, आता तो....

संसदेत घुसखोरी प्रकरण! ‘ऐवढे’ कर्मचारी निलंबित, आरोपीचे वडील म्हणाले, आता तो….

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था-
बुधवारी (दि. १३) संसदेत घुसखोरी केल्याप्रकरणी संसद सचिवालयाने आठ सुरक्षा कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. दरम्यान, संसदेतील घुसखोरी प्रकरण केंद्र सरकारने गंभीरतेने घेतले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी सकाळी संसदेत पोचताच केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली.

संसद सुरक्षेतील त्रुटीवर देशभर चर्चा होत असून, सुरक्षा यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र या सुरक्षा कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या बैठकीस गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि अनुराग ठाकूर उपस्थित होते.

दरम्यान, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी यापूर्वीही संसदेबाहेर रेकी केली होती. सर्व आरोपी भगत सिंग फॅन लब या सोशल मीडिया पेजशी संबंधित होते. सुमारे दीड वर्षापूर्वी सर्व आरोपी म्हैसूरमध्ये भेटले होते. आरोपी सागर जुलैमध्ये लखनऊहून दिल्लीत आला होता, पण संसद भवनात प्रवेश करू शकला नाही. १० डिसेंबरला प्रत्येक आपापल्या राज्यातून दिल्लीला पोहोचले. घटनेच्या दिवशी सर्व आरोपी इंडिया गेटजवळ जमले होते. तेथे सर्वांना कलर स्प्रे वाटण्यात आले. प्राथमिक तपासानुसार संसदेच्या सुरक्षा भंगाचा मुख्य सूत्रधार दुसराच आहे.

बुधवारच्या हल्ल्यानंतर आता सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये अनेक बदल केले जात आहेत. त्यात खासदार, कर्मचारी आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असतील. चौथ्या गेटमधून अभ्यागतांना प्रवेश दिला जाईल. अभ्यागत पास जारी करणे सध्या थांबवले आहे. प्रेक्षक गॅलरीच्या आजूबाजूला काचेचे तावदान बसवले जाईल, जेणेकरून कोणीही उडी मारून सभागृहात प्रवेश करू शकणार नाही.विमानतळांप्रमाणे बॉडी स्कॅन मशीन्स बसवण्यात येतील. सुरक्षा कर्मचार्‍यांची संख्याही वाढवली जाईल.

संसदीय सुरक्षेशी संबंधित एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने सांगितले की, गॅस कॅन आत कसा पोहोचतो ही सर्वात आश्चर्याची गोष्ट आहे. तो शूज किंवा सॉसमध्ये लपवला असेल तर तो निश्चित ‘डीएफएमडी’ने (डोअरफ्रेम मेटल डिटेटर) ने पकडला असता. तथापि, एक संभाव्य कारण असे आहे की संसदेचे सुरक्षा गॅझेट १९ वर्षे जुने आहे. आणखी एका संसदीय सुरक्षा अधिकार्‍याने सांगितले की, १० वर्षांपासून त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये कोणतीही नवीन भरती झालेली नाही. सुमारे दीडशे सुरक्षा कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. नवीन संसदेत फक्त फेशियल रिडिंग उपकरणे नवीन आहेत. उर्वरित मॅन्युअल तपासणी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे.

निलम भाजप विरोधी

संसदेच्या आवारात मोठमोठ्याने घोषणा देणारी निलम ही यापूर्वी किसान आंदोलनात सहभागी होऊन भाषणे ठोकत होती. तसेच विविध ठिकाणी ती भाजप विरोधात प्रचार करतानाचेही व्हिडीओ आता येत आहेत. तिने वापरलेला ‘तानाशाही’ हा शब्द विरोधक मोदी विरोधात नेहमी वापरत असतात. त्यामुळे हे प्रकरण वेगळे असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

ललित मात्र फरार

या ५ पात्रांशिवाय आणखी एक ललित हे नाव समोर आले आहे. तो हरियाणाचा रहिवासी आहे. याची अधिक माहिती अद्याप समोर आली नाही. तो फरार आहे. त्याच्या शोधासाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले. अटक केलेल्यांची केंद्रीय यंत्रणा चौकशी करत आहेत.

त्याला फाशी द्या; आरोपीचे वडील

एक आरोपी डी. मनोरंजन हा कर्नाटकातील म्हैसूरचा आहेत. त्याने २०१६ मध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली. दिल्ली आणि बंगळुरू येथील काही कंपन्यांमध्ये काम केले. आता तो कुटुंबासह शेतीची कामे पाहत होता. मनोरंजन याने भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या कार्यालयातून लोकसभेत प्रवेशासाठी पास घेतला. त्याने सागर शर्माला आपला मित्र म्हटले होते. माझ्या मुलाने चूक केली असेल तर त्याला फाशी द्या, असे मनोरंजनचे वडील देवराज गौडा म्हणाले. ती संसद आमची आहे. मात्र, आपला मुलगा प्रामाणिक आणि सत्यवादी असल्याचा दावाही त्यांनी केला.

अमोलने सैन्य भरतीचे कारण सांगितले

अमोल शिंदे (२५) महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यातील झरी येथील आहे. त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पोलीस आणि सैन्य भरती परीक्षेची तयारी करताना रोजंदारी मजूर म्हणून काम केले. अमोलचे आई-वडील आणि दोन भाऊ मोलमजुरी करतात. अमोलच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तो ९ डिसेंबरला सैन्य भरतीसाठी दिल्लीला जात असल्याचे सांगून गेला होता.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी! मंत्री विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला विश्‍वास

राहुरी । नगर सहयाद्री:- लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम...

जामिनावर सुटलेल्या आरोपीचे ‘भयंकर’ कृत्य! अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील संगमनेरतालुक्यामध्ये मध्ये जामिनावर सुटलेल्या एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार...

‘सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप’

निघोज । नगर सहयाद्री जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब...

अहमदनगर ब्रेकिंग! तलाठी आणि मंडल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत तलाठी आणि मंडल अधिकारी...