spot_img
ब्रेकिंगराज्यात पुन्हा 'अवकाळी'! 'या' जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात पुन्हा ‘अवकाळी’! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

spot_img

मुंबई।नगर सहयाद्री

जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाने तडाखा दिला असून गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे नगर, पारनेर तालुक्यातील पिकांचे पुन्हा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी रात्री जिल्ह्यात १६ मिलीमिटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. नगर, पारनेर, जामखेड, श्रीगोंदा परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला.

गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात सोसाट्याच्या वार्‍यासह गारपीट होवून जिल्ह्यात सुमारे तब्बल १५ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जात नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

परंतु, गुरुवारी रात्री पुन्हा अवकाळी पावसाने नगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड तालुक्याला तडाखा दिला. नगर ३२.८, पारनेर २२.१, श्रीगोंदा २७.२, जामखेड ३७.२, मिलीमिटर पाऊस झाला. तसेच कर्जत, शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. जेऊर मंडलात ५५, चास ५१, देवदैठण ८६.३ मिलीमिटर पाऊस झाला.

महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधारेची शक्यता

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असून मध्यप्रदेश व महाराष्ट्रात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे. साधारण तीन डिसेंबरपर्यंत हे चक्रीवादळ तयार होईल. या दरम्यान विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण येथे शुक्रवारी पावसाची शयता असून हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. मोसमी पाऊस परतला असला तरीही अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे.

हवामान खात्याने शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वार्‍यासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, अशी शयता वर्तवली आहे. विदर्भातील यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात पावसाची शयता आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नाशिक तसेच मराठवाड्यातील जालना व छत्रपती संभाजीनगर येथे मेघगर्जनेसह पावसाची शयता वर्तवली आहे. विदर्भात रविवार ते मंगळवारपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...