spot_img
मनोरंजनएकेकाळी 'या' स्टारकिडची खिल्ली उडवायचे, आज त्याची आहे 3101 कोटींची संपत्ती

एकेकाळी ‘या’ स्टारकिडची खिल्ली उडवायचे, आज त्याची आहे 3101 कोटींची संपत्ती

spot_img

नगर सह्याद्री टीम : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार किड्स आहेत ज्यांनी लहानपणापासून लोकप्रियता मिळवली आहे. तेव्हापासून त्यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यानंतर त्या स्टार किड्सना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते.

पण सर्वच स्टार किड्सच्या बाबतीत तसं नसतं. काही मुले लहान असताना त्यांची सतत खिल्ली उडवली जात असे. इतकंच नाही तर शाळेतून आल्यानंतर आईसमोर रडत असत. पण जेव्हा तो मोठा झाला आणि चित्रपटसृष्टीत आला तर त्यानं असं काम केलं की जगभरात त्याला सगळं जग पाहू लागलं. याच स्टार किडची आज 3101 कोटींची एकूण संपत्ती आहे.

हा स्टार किड 80 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय लाइल्ड आर्टिस्ट होता आणि त्याने एका चित्रपटात रजनीकांतच्या मुलाची भूमिका साकारली होती. इतकंच नाही तर त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळे आज हा मुलगा बॉलिवूड कलाकारांच्या A यादीत आहे. या दुसरा कोणी नसून अभिनेता हृतिक रोशन आहे.

हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट 2000 मधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला. विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाला 92 पुरस्कार मिळाले. आतापर्यंत इतके पुरस्कार जिंकण्याचा हा विक्रम आहे. हृतिक रोशनने आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

हृतिक रोशन जेव्हा शाळेत होता तेव्हा त्याला सतत चिडवायचे. त्याचं कारण तो अडखळत बोलायचा. त्यामुळेच शाळेत असताना लोक त्याची मस्करी करायचे. इतकंच नाही तर काही सिनीयर मुलांनी त्याची सायकल देखील तोडली होती.

नंतर त्याने चित्रपटांमध्ये चाइल्ड आर्टीस्ट म्हणून काम केल्यानंतर त्यानं वडील राकेश रोशनच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर हृतिकची एकूण नेटवर्थ ही आज 3101 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...