अहमदनगर / नगर सह्याद्री : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता निलेश लंके विरोधात सुजय विखे अशी लढत होईल. परंतु आता या घडामोडींनंतर आ.रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
“पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी पुन्हा शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहित पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत काल त्यांनी राजीनामा दिला. हा तर ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है!
अनेक आमदार आमच्या आणि साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेकांना आपण परत घेऊ ,” असे ते म्हणालेत. तसेच “बारामती मतदार संघाचे नऊ सर्व्हे अजित पवार गटाकडुन झाले आहेत. त्यात त्यांचे उमेदवार सर्व सर्व्हेमध्ये मागे असल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळेच त्यांच्या सर्व्हेमधे पुढे दिसत आहे. त्यामुळे ते आता दहावा सर्व्हे करतील. आणि त्यानंतर बारामतीचा उमेदवार जाहीर करतील,” असा मोठा दावाही रोहित पवार यांनी केला.