पुणे | नगर सह्याद्री
शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.
राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह ४० प्रचारकांच्या नावांचा यामध्ये समावेश आहे.
लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेच्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली. या यादीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, सोनिया दुहान, पूजा मोरे यांच्यासह ४० नेत्यांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकांचे पाच उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये वर्ध्यातून अमर काळे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून सुप्रिया सुळे, नगरमधून निलेश लंके, तसेच दिंडोरीमधून भास्करराव भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माढा आणि सातारा लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत