spot_img
अहमदनगरAhmednagar politics: शिवस्वराज्य यात्रेकडे नगरकरांची पाठ!; उलटसुलट चर्चांना उधाण, सौ. लंके म्हणाल्या...

Ahmednagar politics: शिवस्वराज्य यात्रेकडे नगरकरांची पाठ!; उलटसुलट चर्चांना उधाण, सौ. लंके म्हणाल्या…

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य घराघरात, विचार मनामनात पोहोचविण्यासाठी आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता नगरमध्ये झाली. परंतु, यात्रेमध्ये पारनेर मतदारसंघातील नागरिकांचा भरणा होता. नगर शहरात यात्रेची सांगता होत असतांनाही लंके यांच्या या यात्रेकडे नगकरांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य घराघरात पोहोचविण्यासाठी आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानमार्फत शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. ३ जानेवारीपासून पाथर्डी येथील मोहटादेवी मंदिरापासून यात्रेस सुरुवात झाली. या शिवस्वराज्य यात्रेची सांगता नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सौ. राणीताई लंके यांच्या भाषणाने झाली.

ही यात्रा सक्कर चौकातून सुरू झली. यावेळी सौ. लंके यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात नागरिकांनी शिवस्वराज्य यात्रेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले. सांगता यात्रेमध्ये माजी सभापती सुदाम पवार, उद्योजक अजय लामखडे, शिवाजी होळकर, नितीन भांबळ, संजय जपकर, जालिंदर शिंदे, गजानन पुंड, बाबासाहेब टकले, माजी सरपंच शरद कोठुळे आदी उपस्थित होते.

नगरकरांनी फिरवली पाठ
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. यात्रेची सांगता मंगळवारी (दि. १६) नगर शहरात झाली. यात्रेमध्ये नगर शहरातील नागरिक सहभागी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, यात्रेकडे नगरकरांनी पुर्णतः पाठ फिरवली. यात्रेत पारनेर मतदारसंघातील नागरिकच मोठ्या संख्येने दिसून आले. नगर शहरातील नागरिक यात्रेत सहभागी न झाल्याने याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...