spot_img
अहमदनगरमर्डर, जीव घेणे हल्ले, अत्याचार; नगरकर अस्वस्थ, कोण काय म्हणतेय वाचा...

मर्डर, जीव घेणे हल्ले, अत्याचार; नगरकर अस्वस्थ, कोण काय म्हणतेय वाचा…

spot_img

सकल ब्राह्मण समाजाने घेतली एसपी यांची भेट / धीरज जोशी हल्ल्याप्रकरणी आरोपींना पकडून कठोर कारवाईची मागणी
अहमदनगर | नगर सह्याद्री – 
बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांच्यावर भ्याड हल्ला करणार्‍याना त्वरित अटक करावी, यासाठी सोमवारी सकल ब्राह्मण समाज महासंघ नगर जिल्हा व बन्सीमहाराज परिवाराच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष राजाभाऊ पोतदार, विजय देशपांडे, राजेश भालेराव, नंदकुमार पोळ, प्रभाताई भोंग, श्रुती मनवेलीकर आदींसह जोशी परिवारातील अशोक, राजकुमार, संजय, गोविंद, अनिल यांच्यासह महिला व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले, की १० फेब्रुवारीला रात्री धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून तलवारीने वार करण्यात आला. सकल ब्राह्मण समाज महासंघ या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. आरोपींना अटक व कठोर शासन न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. नगर शहरात व्यापारी व सर्वसामान्यांवर होणार्‍या हल्याचा पोलीस प्रशासनाने गांर्भियाने विचार करून दोषींवर कडक कारवाई करावी.
निवेदन देण्यापूर्वी समाजाचे शेकडो पदाधिकारी हॉस्पिटलजवळ एकत्र आले. तेथून पायी एसपी ऑफिसला जाऊन निवेदन देत पोलीस अधीक्षकांशी चर्चा करण्यात आली. शिष्टंमडळाशी बोलताना राकेश ओला म्हणाले, या गुन्ह्याच्या तपासासाठी चार टीम तपास करत आहोत. विविध ठिकाणचे फुटेज तपासले जात आहेत. लवकरच आरोपी निष्पन्न होतील. जेथे हल्ला झाला तेथील फुटेज तपासले असून तपास चालू असल्याचे सांगितले. यावेळी जोशी परिवारातील महिलांनी आम्हाला येथे राहण्यास भीती वाटत असल्याचे सांगितले. ओला म्हणाले, आरोपी पकडेपर्यंत पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल. मुलीच्या १२ विच्या परीक्षेला सोबत लेडीस पोलीस देण्यात येईल. काही वाटले तर मला कॉल करा, असेही ते म्हणाले.

दरम्यान,येथील बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी (वय ५४ रा. किर्लोस्कर कॉलनी, सावेडी) यांच्यावर शनिवारी (दि. १०) रात्री जीवघेणा हल्ला करणारे अद्याप हाती लागले नसून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह तोफखाना पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फिर्यादीत हल्ल्याचे कारण नमूद केलेले नाही.
धीरज जोशी यांचे नगर शहरातील रामचंद्र खुंट येथे बन्सी महाराज मिठाई नावाचे दुकान आहे. ते दुकान त्यांनी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता बंद केले व दुचाकीवरून घराकडे येण्यासाठी निघाले. किर्लोस्कर कॉलनीत घराजवळ आले, त्यावेळी त्यांची मुलगी पाळीव श्वानाला घेऊन फिरताना दिसली. धीरज तिच्या जवळ थांबले असता मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धीरज यांना शिवीगाळ केली. एकाच्या हातात तलवार व दुसर्‍याच्या हातात काहीतरी हत्यार होते. त्यांनी धीरज यांची गचांडी पकडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात धीरज यांच्या दोन्ही हाताला मार लागून ते जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर हत्यार टाकून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. धीरज यांच्यावरील हल्ल्याचे नेमके कारण आरोपी अटक केल्यानंतरच समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

वागळे, अ‍ॅड. सरोदे, डॉ. चौधरी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा शहर काँग्रेसकडून निषेध
नुकत्याच पुणे येथे निर्भय बनोच्या सभेला जात असताना भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल वागळे, अ‍ॅड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी यांच्यावर भ्याड हल्ला केला. हा हल्ला लोकशाही वरील हल्ला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. राज्यात आणि देशात हुकुमशाही सरकार आहे. लोकशाहीची राजरोसपणे हत्या केली जात आहे, अशी टिका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. चितळे रोड येथे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी या भ्याड हल्याचा निषेध करत जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली आहे.

पुणे भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध, वुई सपोर्ट निखिल वागळे, वुई सपोर्ट अ‍ॅड. असिम सरोदे, वुई सपोर्ट डॉ. विश्वंभर चौधरी असे फलक यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी झळकवले. यावेळी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, उपाध्यक्ष अलतमश जरिवाला, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, साफसफाई कामगार संघटनेचे सचिव विनोद दिवटे, दिव्यांग काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड आदींसह कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते.

काळे म्हणाले, त्या दिवशी पुण्यात वागळे, सरोदे, चौधरी यांची हत्या करण्याचाच कट शिजवला गेला होता. सामाजिक कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी, विशेषत: युवतींनी त्या ठिकाणी निर्भीड भूमिका घेत रस्त्यावर उतरून सभा पार पडण्यासाठी आंदोलन छेडले. त्याला भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी विरोध केला. असे असले तरी देखील निर्भय होत सभा पार पडली.

सावेडी व्यावसायिक हल्ला प्रकरणाचाही केला निषेध
नगर शहरातील सावेडीतील सुप्रसिद्ध व्यावसायिक बन्सी महाराज मिठाईवाले धीरज जोशी यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेचा देखील आम्ही शहर काँग्रेसच्या वतीने निषेध करीत आहोत. लवकरच याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून त्यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे यावेळी किरण काळे म्हणाले.

नगरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडली; शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने पोलिस अधिक्षकांना निवेदन
नगर शहरात खून, दहशत, लूटमार, तांबेमारी, खुनी हल्ले, रस्ता लुट, दरोडे, बलात्कार, विनयभंग असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालेले आहेत. या परिस्थितीकडे पोलीस प्रशासन सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत आहे का? की कर्मचारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना खुली छूट देत आहेत का? हा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे विचाराला आहे.

याप्रसंगी युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, संजय शेंडगे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी, परेश लोखंडे, प्रा.अंबादास शिंदे, अरुण झेंडे, संदिप दातरंगे, पप्पू भाले, गौरव ढोणे, महेश शेळके, ज्येम्स आल्हाट, अशोक दहिफळे, सुरेश क्षीरसागर, डॉ.श्रीकांत चेमटे, उमेश काळे, अनंत राठोड आदिंसह जोशी परिवार उपस्थित होते.

नगरमध्ये बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी यांना मारहाण झाली. त्यांच्यावर रात्रीच्या अंधारात जीवघेणा हल्ला करण्यात आला. आता ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागील आठवड्यात नगरमध्ये राहुरी तालुयात अ‍ॅड. आढाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करून खून करण्यात आला. हे प्रकरण राज्यभर गाजते आहे.
सामान्य माणूस, गोरगरीब, व्यापारी, उद्योजक आणि मालमताधारक नगरमध्ये जीव मुठीत धरून वावरत आहे. बन्सी महाराज मिठाईचे मालक जोशी यांना मारहाण झालेल्या ठिकाणी तर गावठी कट्टा आणि तलवार पोलिसांना सापडली. पोलीस अधिकारी, कर्मचारी कारवाई करीत नसल्याने गुन्हेगारांना फावत. स्त्री अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील दिवसागणिक वाढ होते आहे. गुन्हेगारांना पोलिसांचे भयच राहिलेले नाही, या घटनांमुळे नगरचे नाव बदनाम होत चालले आहे.

व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना अटक करुन कठोर कारवाई करा – राष्ट्रवादी काँग्रेस
आज पर्यंत पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या गोळीबार, प्राणघातक हल्ले या सारख्या घटनांचे लोन नगर सारख्या शहरापर्यंत पोहचल्याचे दिसुन येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असुन नगर सारख्या शहरामध्ये सर्व सामान्यांना आजपर्यंत अशा प्रकारच्या घटना केवळ मोठया महानगरांमध्ये घडल्याचे माहित असे परंतु अशा घटना नगर शहरात मोठ्या प्रमाणात सातत्याने घडू लागल्या आहे. हा फार मोठा चिंतेचा विषय असुन नगरमध्ये गावठी कट्टे, तलवारी अशा प्रकारचे शस्त्रे राजरोसपणे कुठुन उपलब्ध केली जात आहेत. याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. गुन्हेगारांवर गंभीर स्वरुपाची कलमे लावुन त्यांच्याविरुध्द योग्य पध्दतीने गुन्हा दाखल झाल्यास अशा प्रकारचे जामीन होणार नाहीत गुन्हेगारांना कायदयाचा धाक राहील अशा उपाययोजना पोलसांनी कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केली.

नगर शहरातील व्यापारी धिरज जोशी यांच्यावरील हल्ला करणाऱ्या आरोपीना तातडीने अटक करुन कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिकराव विधाते, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे, युवकचे अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, जॉय लोखंडे, सुमित कुलकर्णी, ऋषिकेश ताठे, संजय सपकाळ आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठ दिवसात राजकीय स्फोट होणार’, चर्चांना उधाण

यवतमाळ / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून विविध घडामोडी घडतायेत. नुकतेच...

Politics News : अशोक चव्हाणांनी केला आणखी एक भूकंप ! ‘त्या’ ५५ बड्या नेत्यांनी काँग्रेसला ठोकला रामराम

नांदेड / नगर सह्याद्री : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये येत काँग्रेसला...

‘मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमांतून सव्वा दोन कोटींची विकासकामे’

सचिन वराळ पाटील यांची माहिती निघोज। नगर सहयाद्री- निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये...

मराठा आंदोलनाचा थरार ! समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न, तरुणाने भररस्त्यात जाळली नवीकोरी बाईक

जालना / नगर सह्याद्री : राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण...