spot_img
ब्रेकिंगआमदार लंके शुक्रवारी भुमिका जाहीर करणार! विखे विरुद्ध लंके सामना रंगणार?

आमदार लंके शुक्रवारी भुमिका जाहीर करणार! विखे विरुद्ध लंके सामना रंगणार?

spot_img

शरद झावरे | नगर सह्याद्री
आमदार नीलेश लंके पती – पत्नी अहमदनगर लोकसभा मतदारसघातून इच्छुक असून शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शयता आहे. त्यामुळे आपल्या निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेससह जीवलग कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी शुक्रवारी सुपा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे. आमदार लंके यांच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या बैठकीचा मेसेज सोशल मिडिया वर देण्यात आला आहे.

त्यामुळे शुक्रवारी आमदार लंके भुमिका जाहिर करण्याची शयता व्यक्त केली जात आहे. तर आमदार लंके किंवा त्यांच्या पत्नी सौ. राणीताई लंके लोकसभा निवडणुकीत शड्डु ठोकण्याच्या तयारीत असुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ते असतील. मात्र आमदार लंके हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देतात की अन्य कायदेशीर मार्ग निवडतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात विखे विरुद्ध लंके सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी देण्यापूवी शरद पवार गट कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेत असून त्यानंतरच लंके यांच्या उमेदवारीचा फैसला होणार आहे. आता उमेदवारी करताना कायदेशीर पेच नको म्हणन आ. लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर आ. लंके यांनी खुलासा केला असून, राजीनामादेण्याच्या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे.

माझा राजीनामा द्यायचा आणि मलाच माहिती नाही अशी प्रतिक्रीया आमदार लंके यांनी दिली आहे. भाजपकडून अहमदनगर लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा एकदा खा. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर करण्यात आला नाही. दरम्यान आमदार नीलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगर लोकसभा लढवणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती.

त्यामुळे असे झाल्यास अहमदनगर लोकसभा मतदारसंघात खा. विखे विरुद्ध आ. लंके अशी लढत पाहायला मिळेल. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की राजकारण कधीही कोणत्याही वळणार जाऊ शकते असे सुचक वक्तव्य त्यांनी केले आहे.महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली होती.

आ. लंके शरद पवार गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चां अनेक दिवसांपासून सुरु आहेत. अशातच आ. लंके यांनी काही दिवसांपूर्वी नगरमध्ये राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडीच्या महृत्वाच्या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीला शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके देखील उपस्थित होते. त्यामुळे लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना अधिक वेग आला.

 ठाकरे, थोरातांचा हिरवा कंदील
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके की त्यांच्या पत्नी सौ. राणीताई लंके यांच्या नावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होणार आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व काँग्रसचे गटनेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तुतारी चिन्ह घेऊन लंके निवडणुकीत उतरणार आहेत. विखे – लंके लढतीमुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विखे जाहीर सभांमध्ये तर लंके पती-पत्नी गावागावात..
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय आमदार नीलेश लंके व पत्नी राणीताई लंके यांनी घेतला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आत प्रचाराची राळ उडाली आहे. भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिवसेना भाजपाच्या प्रमुख नेते व पदाधिकारी यांना बरोबर घेऊन जाहिर सभा घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे आमदार लंके व सौ. राणीताई लंके यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत विविध सामाजिक व धार्मिक व वैयक्तिक कार्यक्रमांना हजेरी लावून शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे थेट जनतेत जाऊन कोनासा घेण्याचा प्रयत्न लंके पती – पत्नी करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

निलेश लंके यांना पारनेर मध्ये जोरदार धक्का; पारनेरचे बेलकर बंधू सुजय विखे यांच्यासोबत

पारनेर/ नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत नगर मध्ये निर्माण झालेली चुरस आत्ता निर्णायक अवस्थेत आली आहे....

Voting: ओळखपत्र नाही तरी करा मतदान? ‘हे’ पुरावे धरले जातात ग्राह्य, पहा यादी..

नगर सहयाद्री वेब टीम- मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास...

Politics News: हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होणार! ‘यांच्या’ विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे...

Health Tips: तुम्हालाही चहा पिण्याची सवय असेल तर ती आजच थांबवा, अन्यथा होईल शरीरावर दुष्परिणाम

नगर सह्याद्री वेब टीम अनेकांना दररोज चहा पिण्याची सवय मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे अनेक लोक...