spot_img
ब्रेकिंग'दूध दर वाढीसाठी दुग्धाभिषेक आंदोलन'

‘दूध दर वाढीसाठी दुग्धाभिषेक आंदोलन’

spot_img

पाथर्डी | नगर सह्याद्री

दुधाला शासनाच्या हमीभावाप्रमाणे दर मिळावा, पशुखाद्यांच्या किंमती नियंत्रणात आणाव्यात, शासनाने जनावरांसाठी चारा डेपो व पेंड उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक गावात पशुवैद्यकीय सुविधा केंद्र सुरू करावेत, पाथर्डी, शेवगाव तालुयात गंभीर दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी पाथर्डी येथील वसंतराव नाईक चौकात दूध उत्पादक शेतकर्‍यांनी दुग्धाभिषेक आंदोलन केले.

यावेळी आदिनाथ देवढे, सुनील पाखरे यांनी आक्रमक भूमिका घेत लोकप्रतिनिधी व सरकार विरोधात हल्लाबोल केला. तहसीलदार श्याम वाडकर यांनी आंदोलकांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांनी शासना विरोधात घोषणाबाजी केली. शासनाच्या हमीभावाप्रमाणे दर न देणार्‍या शासकीय सहकारी दूध संघ व खासगी प्रकल्पांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांवर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ याकरिता ३४ रूपये दर दिला जाईल, असे जाहीर केले होते. तसा निर्णय होऊन शासकीय दूध संघ आणि खाजगी दूध संस्था २५-२६ रूपये प्रतिलिटर प्रमाणे भाव देत आहे. चारा आणि पशुखाद्यांचे दर कडाडले असून शेतकर्‍यांचा दूध व्यवसाय कोलमडण्याच्या अवस्थेत आहे. सरकारी व खासगी दूध संघ कुणाच्या आशिर्वादाने? दिवसाढवळ्या शेतकरी दूध उत्पादकांची लूट करत आहेत, असा प्रश्न आदिनाथ देवढे यांनी उपस्थित केला.

शासकीय हमीभाव झुगारून देत दूध उत्पादकांना खुलेआम लुटणार्‍या प्रकल्पांवर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी केली. आंदोलनात ज्ञानेश्वर खवले, अक्षय वायकर, शहादेव भाबड, दत्तात्रय बडे, तुकाराम देवढे, प्रेमचंद खंडागळे, भीम गर्जे, महादेव मरकड, डॉ. सुहास सोनावणे, गणेश देवढे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अभिनेत्री नयनतारा झाली सायबर क्राईमची शिकार; पहा नेमक काय घडलं…

नगर सह्याद्री वेब टीम - नयनतारा ही साऊथची सुपरस्टार आहे. तिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत...

‘पोलिस मुख्यालयातील बाप्पाचे विसर्जन’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर पोलिसांकडून आजच बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. गेल्या आठ...

बापरे! महापालिकेत ६० कोटींचा भ्रष्टाचार? ‘कोणी आणि का केली मागणी?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगिराज शशिकांत गाडे यांनी शहरात सुरू असलेल्या...

खा. नीलेश लंके यांना भाजपची ‘मोलाची साथ’; राणीताई लंके यांचा विधानसभेचा मार्ग सुकर होणार

पारनेरला राज्य शासनाचा कोट्यवधींचा निधी | आ. टिळेकर धावले मदतीला | राणीताई लंके यांचा...