spot_img
महाराष्ट्र...म्हणजेच राष्ट्रवादी! राज ठाकरे यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

…म्हणजेच राष्ट्रवादी! राज ठाकरे यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

spot_img

नाशिक। नगर सहयाद्री
राजकारणात टिकायचे असेल तर संयम हा महत्त्वाचा आहे. गेली १८ वर्ष अनेक चढउतार पाहिले. माझ्या कडेवरती माझीच पोरं खेळवायची आहेत. इतरांची नाही. राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणार्‍या माणसांची मोळी अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

मनसेच्या वर्धापन दिन मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, गेल्या १८ वर्षात अनेक चढउतार पाहिले, चढ कमी उतारच जास्त पाहिले. या अनेक चढउतारात तुम्ही माझ्यासोबत राहिला. यश तुम्हाला मिळवून देणारच, पण त्यासाठी संयम लागतो. माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा निवडून येणार्‍या माणसांची मोळी आहे. जे जे निवडून येतात त्यांची मोळी सोबत घेतात आणि हा माझा पक्ष आहे असं सांगतात. शरद पवार नेहमी हेच करत आलेत. आता वेगळे झाले तेही निवडून येणारेच आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच या महाराष्ट्रात जर खर्‍या अर्थाने पक्ष स्थापन झाला असेल तर जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यातील ९९ टक्के लोकांचा कधी राजकारणाशी संबंध नव्हता. अविनाश जाधव यासारखे असंख्य ज्यांचा राजकीय काही वारसा नव्हता ते समोर आले. आपली भूमिका स्वच्छ आणि प्रामाणिक होती. अनेक विषयांवर बोलायचंय, येत्या ९ एप्रिलला गुढी पाडवा मेळाव्यात बोलेन असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

राजकारणात संयम महत्वाचा
आज पक्षाला १८ वर्ष पूर्ण होतायेत. तुम्हाला थोडासा राजकीय इतिहास सांगणे गरजेचे आहे. राजकारणात जर टिकायचे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तो म्हणजे संयम..तुमच्या आजूबाजूला जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे यश तुम्हाला आता दिसतंय. नरेंद्र मोदींचे यश २०१४ सालचं असेल. पण ते संपूर्ण श्रेय त्या पक्षासाठी झटत असणार्‍या कार्यकर्त्यांचा आहे. १९५२ साली जनता पक्ष स्थापन झाला, १९८० साली भाजपा नामकरण झाले. ५२ सालापासून इतया लोकांनी मेहनत घेतलीय. इतकी वर्षाच्या मेहनतीनंतर मिळालेले हे यश आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...