spot_img
ब्रेकिंगमराठा आरक्षण, जनतेचा अंत पाहू नये; सुजित झावरे पाटलांनी सरकारला दिला 'हा'...

मराठा आरक्षण, जनतेचा अंत पाहू नये; सुजित झावरे पाटलांनी सरकारला दिला ‘हा’ सल्ला

spot_img

पारनेर। नगर सहयाद्री-

आरक्षण प्रश्नी सरकारने धोरणात्मक निर्णय न घेता केवळ वेळकाढूपणा करून मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचे काम सुरु असून मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने जनतेचा अंत न पहाता मराठा समाजाचे समाधान होईल, असे आरक्षण त्यांच्या पदरात तत्काळ टाकावे अन्यथा हा लढा तीव्र होईल, अशी भावना सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे -पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठीअनेक ठिकाणी मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण आंदोलनास पाठिंबा देत याच पाश्वभूमीवर ते बोलत होते.

झावरे पाटील म्हणाले, सरकारी नोकरी किंवा शिक्षणव्यवस्था यामध्ये मराठा समाजाचा तरुण आजही उपेक्षित आहे. अस होत असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांसाठी काहीतरी गाजर किंवा आमिष दाखवून मराठा समाजाचा वापर करुन घ्यायचा आणि एरवी समाजाला झुलत ठेवण्याचे काम शासनाने आतापर्यंत केले असून यापुढच्या काळात शासनाने तसा कुठला प्रयत्न करुन मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये तसेच मर्यादेचे उल्लंघन करु नये.

आरक्षण प्रश्नाबाबत शासनाने वेळकाढूपणाचे धोरण बाजूला ठेवत राज्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या मराठा समाजाच्या जिव्हाळ्याच्या आरक्षण प्रश्नाबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या समाजाला विरोध न करता मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वसमावेशक कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मिळावे ही सकल मराठा समाजाची भावना आहे.

पुढे बोलतांना झावरे पाटील म्हणाले, सरकारने केवळ मतांसाठी समाजाचा वापर न करता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सहानुभूतीचा खोटा मुखवटा जनतेसमोर दाखवू नये. सद्यस्थितीत सरकारमधील मंत्री हे स्वतःचे पदे टिकविणे व मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात मश्गूल आहेत. खोटे आश्वासने देऊन राज्यातील जनतेला वेड्यात काढण्याचे काम सरकार करत आहे.

सदर प्रश्नावर राजकीय नेत्यांनी पाठिंबा देण्यापेक्षा सदर प्रश्नावर व्यापक लढा उभारण्याची गरज आहे. आरक्षण प्रश्नावर तातडीने आम्हाला न्याय द्यावा तसेच मराठा समाजाला न्याय देणे शक्य नसेल तर एकतर सरसकट राज्यातील सर्वच प्रकारच्या समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा सर्व समाजाचे आरक्षण काढून घ्यावे अन्यथा येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकांच्या तीव्र भावनेचा उद्रेक सरकारला सहन करावा लागेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

मुंबई | नगर सह्याद्री आता संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने...

Ahmednagar Crime: धक्कादायक! केसेस करता म्हणून दिव्यांगाला औषध पाजून मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर। नगर सहयाद्री केसेस करतो म्हणून दिव्यांग व्यक्तीला विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला....

Accident News: पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये कारचालकाने तिघांना उडवलं!

नागपूर । नगर सहयाद्री- पुण्यात अल्पवयीन चालकाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना...

Ahmednagar Crime: लिफ्ट देण्याच्या बहाणा,अन भलताच कुटाणा? नगरच्या युवका सोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच,...