spot_img
अहमदनगरManoj Jarange News : मराठे कोणाला घाबरत नाहीत हे दाखवण्याची वेळ आली...

Manoj Jarange News : मराठे कोणाला घाबरत नाहीत हे दाखवण्याची वेळ आली ! नगरमध्ये १५० एकरवर मुक्काम, भव्य स्वागत, ‘अशी’ होती भव्य व्यवस्था

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : मराठे कोणाला घाबरत नाहीत, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. तुमच्यात एकी नाही असे ते म्हणत होते. मात्र आता मराठा समाज एकवटला असून जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. सरकारने कोणताही डाव टाकला तरीही तो आता यशस्वी होऊ देणार नाही. तुमच्या आशीर्वादाच्या बळावरच मी मुंबईला चाललो असून परत येईन की नाही हे माहीत नाही. मला दगाफटका झाला तरीही तुम्ही आरक्षणाचे आंदोलन चालू ठेवा असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ( manoj jarange in ahmednagar)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा रविवारी (२१ जानेवारी) अहमदनगरमध्ये आली. या पदयात्रेच्या रात्रीचा मुक्काम बाराबाभळी येथे होता. यावेळी रात्री साडेबारा नंतर येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. यावेळी त्यांनी ही गर्जना केली. यावेळी लाखो मराठा बांधवांचा समुदाय उपस्थित होता.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपल्या मतांच्या जिवावर यांनी राजकारण केले. आता आरक्षण दिले नाही  तर यांना सळो की पळो करून सोडा व त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. तेवीस दिवस मी उपोषण केले असल्याने सध्या माझी तब्बेत बरी नाही. माझे संपूर्ण आयुष्य मी समाजासाठी घालवणार आहे.  आता आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेली पदयात्रा रविवारी (२१ जानेवारी) अहमदनगरमध्ये आली. या पदयात्रेच्या रात्रीचा मुक्काम बाराबाभळी येथे होता.  बाराबाभळी येथे दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था होती. त्यापैकी ८५ एकर जागा ही मदरशाची आहे. जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनीही सेवा दिली. याशिवाय परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठीही परवानगी देण्यात आली होती. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे जामिया मुहम्मदीया मदरसा यांच्यातर्फे स्वागत करणारा फलकही लावण्यात आला होता.

* महिलांची मदरशामध्येच उत्तम व्यवस्था
बाराबाभळी येथील मदरशातच मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्रीचा मुक्काम केला. पदयात्रेत महिलाही सहभागी आहेत. बाहेर थंडी असल्याने मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची झोपण्याची व्यवस्था केली गेली होती. रविवारी रात्री मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजनही घेतले. मदरशातील विद्यार्थ्यांनी मनोभावे सेवा दिली.

* मनोज जरांगे यांना कुराणची प्रत भेट  
मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा समाज बांधवांची अत्यंत व्यवस्थित अशी सोय मदरशामध्ये करण्यात आली होती. एकतेचा, सामाजिक एकोप्याचा संदेश यावेळी संपूर्ण राज्यात पोहोचला आहे. यावेळी मनोज जरांगे यांना मदरशाच्या विश्वस्तांनी मराठी कुराणची प्रत भेट दिली.

* श्रीराम उत्सव साजरा करणार
आज देशभरात अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात आहे. दरम्यान, आम्ही देखील या उत्साहात सहभागी होणार असल्याचे जरांगे म्हणाले. आमच्या पायी दिंडीत आम्ही हा आनंद साजरा करणार असल्याचे जरांगे म्हणाले. आम्ही देखील रामभक्त असून, आम्हाला देखील याचा आनंद आहे. मात्र, सोबतच आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी आरक्षणाचा मुद्दा देखील तेवढाच महत्वाचा असल्याचे जरांगे म्हणाले.

* आ. जगताप यांकडून अल्पोपहार, फलाहार, पाण्याची व्यवस्था  
मनोज जरांगे पाटील हे नगरमध्ये दाखल होताच आ.संग्राम जगताप यांनी देखील त्यांचे स्वागत केले. सोमवारी (२२ जानेवारी) मराठा पायी मोर्चाने  नगर शहरातून मुंबईकडे कूच केली. त्यांच्या जंगी स्वागताची तयारी आमदार संग्राम जगताप यांनी केली होती. मराठा मोर्चेकरांसाठी अल्पोपहार, फलाहार, पाण्याची व्यवस्था केली. गर्दीची काळजी घेऊन शहरामध्ये ६ ठिकाणी प्रशस्त मंडप टाकले होते. स्टेटबँक चौक, चांदणी चौक, एडीसीसी बँक, अरुणोदय हॉस्पिटल, राजयोग हॉटेल, आमदार संग्राम जगताप यांचे कार्यालय आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.

* रविवारी दुपारी पाथर्डीत भव्य स्वागत
रविवारी (दि.२२ जानेवारी) दुपारी ही पदयात्रा पाथर्डी तालुक्यातील आगसखांड शिवारात जेवणासाठी थांबली. सकाळी मिडसांगवी येथे जरांगे पाटील यांचे आगमन झाले. तेथे मिडसांगवी व भालगाव, खरवंडी कासार, मुंगुसवाडे, ढगेवाडी येथील ग्रामस्थांनी आंदोलकांना अल्पोपहार दिला. येळी, भुते टाकळी, आगसखांड फाटा येथे आ. मोनिका राजळे यांनी स्वागत केले. पाथर्डीत आगमन होताच मनोज जरांगे पाटील यांच्यावर सतरा जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. भव्य हार त्यांना घालण्यात आला. त्यानंतर त्यांचा ताफा माळीबाभुळगाव, तिसगाव, करंजी मार्ग नगरच्या दिशेने रवाना झाला.   मराठा समाजातील दानशूरांनी एवढी जेवणाची व्यवस्था केली की आंदोलकांना जेवण करून त्यांच्या सोबत जेवणाची पॅकेटे व पाण्याचे बॉक्स देण्यात आले. महिलांनी सकाळी उठून केलेल्या भाकरी, चपाती व भाज्या दोन्ही ठिकाणी पोहच केल्या होत्या,

* सुपे येथे लापशी पुलावाचा बेत
सुपे येथे पाच लाख मराठा बांधवांच्या दुपारच्या जेवणाची जय्यत तयारी केली. सरदार शाबुसिंग पवार मैदानावर ही व्यस्था आहे. लापशी, पुलाव असा बेत करण्यात आला आहे. दुपारच्या जेवणाची, बाटलीबंद पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर मैदानावर असणार आहेत. तब्बल पाच लाख आंदोलकांना लापशी व पुलावचे भोजन देण्यात येणार आहे. ठेचा भाकरी, चटणी-चपाती या पदार्थाचा समावेश आहे. विविध समाज बांधवांनी एकत्र येत बूंदी, चिवडा या खाद्य पदार्थाचे नियोजन केले आहे. कार्यक्रमस्थळी बाटलीबंद पाण्याच्या खोक्यांचा ओघ सुरू आहे अनेक संस्था, मंडळानी रविवारी (२१ जानेवारी) दुपारपासून मैदानावरच स्वयंपाकाची तयारी सुरू केलेली होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या परीसह घरी परतले ‘माता-पिता’

Deepika Padukone: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज (रविवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दीपिका...

एसटी महामंडळाचा ‘मोठा’ निर्णय; ‘लालपरी’ मध्ये अडचण आल्यास करा ‘हे’ काम!

मुंबई : नगर सह्याद्री:- प्रवाशांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला...

नागरिकांमध्ये मोठी नाराजी; ‘त्या’ रस्त्यावर अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला, कडक कारवाई होणार?

Maharashtra News: आळंदी पुणे रस्त्यावरील वाढते हॉटेल-लॉज आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या महिला परिसरात दिसत...

मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार दोन दिवसांत राजीनामा’; ‘भाजपने नवा ‘फॉर्म्युला’ तयार केला..

Politics News: दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली...