spot_img
अहमदनगरमहायुतीच ठरलं! लोकसभेच्या उमेदवारांची यादी व्हायरल, शिर्डीमधून आठवले, नगर मधून...

महायुतीच ठरलं! लोकसभेच्या उमेदवारांची यादी व्हायरल, शिर्डीमधून आठवले, नगर मधून…

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री
पुढील आठवड्यात आचार संहिता लागून लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होवू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महायुतीमध्ये समाविष्ट असणारे शिंदे गट शिवसेना, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि भाजप असे तीन पक्ष आहेत. त्यामुळे जागेचे वाटप कसे होणार याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता महायुतीच्या जागांवरील उमेदवार फिस झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिर्डीत खा. लोखंडे व अहमदनगरमधून खा.सुजय विखे यांना पुनःश्च संधी मिळणार का यांच्या अनेक चर्चा सध्या सुरु असतानाच आता महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची यादी एका मीडियाने व्हायरल केली आहे. त्यांनी असा दावा केलाय की ही आतली यादी त्यांच्या हाती आली आहे.

महाराष्ट्रातील महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा पुढच्या २ दिवसांत संपेल असे दिसते कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत मुंबईत (मंगळवारी) महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार असून यात उमेदवार निश्चिती होईल असे दिसते. दरम्यान या आलेल्या यादीत अहमदनगर व शिर्डी जागा कोणाकडे असेल हे देखील दाखवण्यात आले आहे.

शिर्डीमधून रामदास आठवले
शिर्डीमध्ये शिंदे गटाचे खा. सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत. परंतु महायुतीच्या जागावाटपात ही जागा बहुतेक रामदास आठवलेंना जाईल असे या यादीत दाखवण्यात आले आहे. भाजप शिर्डीमध्ये रामदास आठवलेंना तिकीट देऊ शकते. या जागेवर रामदास आठवले यांनी दावा देखील केलेला आहे.

अहमदनगरमधून खा. सुजय विखे यांनाच संधी
लोकसभेसाठी अहमदनगर या जागेसाठी खा. सुजय विखे हेच उमेदवार भाजपकडून राहतील असे या यादीत दिसते. त्यामुळे खा. सुजय विखे यांना भाजप उमेदवारी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच दक्षिणेसाठी खा. सुजय विखे हेच भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील हे सध्या तरी या व्हायरल यादीत दिसत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...