spot_img
अहमदनगरAhmednagar: कोरठण खंडोबा वार्षिक यात्रोत्सवगुरुवार पासून सुरुवात

Ahmednagar: कोरठण खंडोबा वार्षिक यात्रोत्सवगुरुवार पासून सुरुवात

spot_img

पारनेर | नगर सह्याद्री
पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान गडावर देवस्थान ट्रस्टकडून वार्षिक यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गुरूवार (दि.२५ जानेवारी) पासून तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, राजेंद्र चौधरी यांनी दिली.

गुरुवारी पहाटे ४ वा. खंडोबा देवाला मंगलस्नान, पूजा, चांदीचे सिंहासन व चांदीच्या उत्सव मुर्तीचे अनावरण होईल. सकाळी ६ वाजता आ. निलेश लंके, राणी लंके, तहसिलदार गायत्री सौंदाने यांच्या हस्ते अभिषेक महापूजा, महाआरती होईल. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुले होईल.

सायंकाळी ४ वाजता कोरठण खंडोबा पालखी गावात मुक्कामी जाईल. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळपासून देवदर्शन सुरु होईल, खंडोबा पालखी मंदिराकडे येईल. दहा वाजता बैलगाडा घाटाचे पूजन होईल. संगमनेर तालुयातील सावरगाव घुले येथूनआलेल्या खंडोबा मानाची पालखीची मिरवणूक व देवदर्शन कार्यक्रम मंदिराजवळ होईल.

सायंकाळी छबिना मिरवणूक असेल. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस असेल. सकाळी ८ वाजता खंडोबा चांदिची पालखी आणि अळकुटी, बेल्हे, कांदळी वडगांव ,माळवाडी, सावरगांव घुले, कासारे, कळस येथुन आलेल्या पालख्यांची मिरवणूक निघेल. दुपारी १२ वाजता मंदिराच्या पायर्‍यांवर येऊन या मिरवणुकीची सांगता होईल. दुपारी १ वाजता बेल्हा व ब्राह्मणवाडा येथून आलेल्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक होईल अशी माहिती विश्वस्त अ‍ॅड.पांडुरंग गायकवाड, राजेंद्र चौधरी, खजिनदार तुकाराम जगताप, जालिंदर खोसे, कमलेश घुले, अशोक घुले, चंद्रभान ठुबे, सुवर्णा घाडगे, सुरेश फापाळे, रामदास मुळे, महादेव पुंडे, धोंडीभाऊ जगताप, दिलीप घुले आदींनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...