spot_img
ब्रेकिंगIPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स तिसर्‍यांदा चॅम्पियन..!

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स तिसर्‍यांदा चॅम्पियन..!

spot_img

हैदराबादचा पराभव करत पटकावले आयपीएल २०२४चे विजेतेपद
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
आयपीएल २०२४ च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला आहे. यासह केकेआरने तिसर्‍यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी, गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा (२०१२ आणि २०१४) आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करत ११४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात कोलकाताने १०.३ षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले आणि हैदराबादचा आठ गडी राखून पराभव केला. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यर आणि गुरबाज अहमद यांच्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर सामना जिंकला. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने अवघ्या २६ चेंडूत ५२ धावांची नाबाद सामना जिंकणारी खेळी खेळली.

कर्णधार श्रेयस अय्यर ३ चेंडूत ६ धावा काढून नाबाद राहिला.कोलकाताला पहिला धक्का सुनील नरेनच्या रूपाने बसला. त्याला पॅट कमिन्सने शाहबाज अहमदच्या हाती झेलबाद केले. त्याला दोन चेंडूत केवळ सहा धावा करता आल्या. त्यानंतर कोलकाताला दुसरा धक्का रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने बसला. त्याला शाहबाज अहमदने एलबीडब्ल्यू आऊट केले. तो ३२ चेंडूत ३९ धावा करून माघारी परतला.

त्यानं आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले.तत्पूर्वी, आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ कोलकाता नाईट रायडर्ससमोर केवळ ११३ धावांवर आटोपला. कोलकाताच्या गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीसमोर हैदराबादचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. आयपीएलच्या इतिहासातील अंतिम फेरीतील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१३ मध्ये मुंबईने चेन्नईला १४९ धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात चेन्नईला केवळ १२५ धावा करता आल्या होत्या. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ बळी घेतले. हैदराबादचा संघ १८.३ षटकात ११३ धावांवर ऑलआऊट झाला.

दहा वर्षांनी केकेआरने पटकावले विजेतेपद
कोलकाता नाईट रायडर्स याआधी २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल चॅम्पियन बनले होते. केकेआरने २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून आणि २०१४ मध्ये पंजाब किंग्जचा ३ गडी राखून पराभव करून आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. २०१४ नंतर, कोलकाता २०२१ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला, परंतु विजेतेपदाच्या लढतीत सीएसके कडून २७ धावांनी पराभूत झाला. आता अखेर २०१४ च्या म्हणजेच १० वर्षांनंतर तिसर्‍यांदा इंडियन प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे. यासह कोलकाताने आयपीएलच्या इतिहासात तिसर्‍यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.
लवकरच मान्सून केरळमध्ये धडकणार

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी ; दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - राजधानी दिल्लीत हिवाळ्यात वाढते प्रदूषण पाहता १४ ऑक्टोबर २०२४ ते...

निवडणुकीपूर्वीच मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, प्रकरण काय?

Politics News:- आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापत आहे. सत्ताधारी आणि विरोधक...

टोल माफीनंतर एसटी प्रवाशांना मोठा दिलासा; एसटी महामंडळाने घेतला निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याचा कालावधीसाठी प्रवास...

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान’

मुंबई / नगर सह्याद्री - बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ...