spot_img
अहमदनगरअहमदनगर : 'काँग्रेसच्या 'त्या' जिल्हाध्यक्षांना जीवे मारण्याचा कट शिजतोय, कोतवाली पोलीस स्टेशन...

अहमदनगर : ‘काँग्रेसच्या ‘त्या’ जिल्हाध्यक्षांना जीवे मारण्याचा कट शिजतोय, कोतवाली पोलीस स्टेशन राष्ट्रवादी भवन झालेय’ गंभीर गौप्यस्फोट

spot_img

काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे यांचा आरोप ः पत्रकार परिषदेत सीसीटीव्ही फुटेज सादर
अहमदनगर। नगर सहयाद्री 

हर्षद चावला याच्यावर कोणीही हल्ला केला नाही. हाफ मर्डरचा केवळ बनाव रचला आहे. चावला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून या बनावाचा खरा मास्टरमाईंड राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला. खोसे याला मुख्य आरोपी करून कटकारस्थान, षडयंत्र रचल्याचा गुन्हा दाखल करून अटक करावी. या बनाव प्रकरणात राष्ट्रवादी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, कार्यकर्ता सुरज जाधव, सचिन दगडे यांना देखील आरोपी करावे, अशीही मागणी काळे यांनी केली. ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांच्या हत्येचा कट शिजवला जात असून, त्यासाठीच त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी चावला सातत्याने करत आहेत, असेही काळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस संजय झिंजे, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, अलतमश जरीवाला, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत चावला याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदत करतानाचे सिव्हील हॉस्पिटल येथील सीसीटीव्ही फुटेज दाखवत काळे गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, खोसे व चावला यांनी संगनमत करत खून करण्याच्या दृष्टीने हल्ला झाल्याचा बनाव केला होता. यासाठी दिवस, वेळ, जागा निश्चित केली गेली. आम्ही हल्लेखोर पाठवत चावला याला संपवून टाका, काटा काढा, सोडू नका, जिवे मारून टाका असे म्हणत मला आणि झिंजे यांना गोवण्याचा कट शिजला. आधी तीन लोकांना आरोपी केले. त्यांच्या तोंडी आमची नावे घातली गेली. आमच्यावर १२० ब प्रमाणे कट रचल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र कोतवाली पोलीस स्टेशनच्या काही लोकांना हाताशी धरून रचण्यात आले. ज्या तिघांना पोलिसांनी आरोपी केले आहे, त्या तिघांनीही हल्ला केला नसल्याचे स्पष्ट करत आपल्याजवळ तसे पुरावे असल्याचे म्हटले आहे. कोतवाली निरीक्षकांकडे लेखी अर्ज, समक्ष भेट, फोन, पाठपुरावा करुन एफआयआरची प्रत मागूनही ती दिली नसल्याचे काळे म्हणाले.

कोतवाली पोलीस निरीक्षक यांनी राजकीय दबावातून कोणतीही शहानिशा न करता घाईने हाफ मर्डरचे ३०७ हे कलम लावले. यासाठी डॉटरांचे प्रमाणपत्र घेतले नाही. कोतवाली पोलीस स्टेशन राष्ट्रवादी भवन झाले आहे. खोटेनाटे गुन्हे दाखल करून शहरातील राजकीय कार्यकर्त्यांसह अनेकांना उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कोतवालीला सक्षम, दबंग, निष्कलंक अधिकार्‍याची गरज आहे. तथाकथित हल्ल्यानंतर कोतवाली पोलीस निरीक्षकांना कोणाचे फोन आले, त्याचा सीडीआर काढावा. खोसे, भांडवलकर, चावला, सुरज जाधव, सचिन दगडे यांचा मागील सहा महिन्यांचा सीडीआर व एसडीआर तपासावा. साडेनऊ वाजता हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चावला प्रत्यक्षात अकराच्या सुमारास सिव्हिलला पोहोचला. मधल्या दीड तास चावला कुठे होता? या काळात त्याने कोणाशी संपर्क केला? सिव्हीलला डॉटरांना टाके घालू दिले नाहीत. येताना चावला नीट चालत आला. सिव्हिलला कॅज्युल्टीमधून त्याने मीडियाला बाईट दिल्या. जाताना मात्र व्हीलचेअर मागवली. गाडीत तो स्वतः उठून बसला.

कटाचा मास्टरमाईंड अभिजीत खोसे नियोजनाप्रमाणे पांढर्‍या रंगाच्या इनोव्हा गाडीतून चावला याला सिव्हिल हॉस्पिटल येथे घेण्यासाठी आला. ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. खोसे याने चावलाला सावेडी उपनगरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल केले. राष्ट्रवादीशी निगडित कोणतेही प्रकरण असले की त्याच ठराविक हॉस्पिटलचे नाव पुढे का येते? त्या हॉस्पिटलचे सीसीटीव्ही ताब्यात घ्यावे? घटना घडल्याच्या मार्गाचे फुटेज तपासावे. सुरज जाधव याचा पोलिसांनी पाठवलेला हद्दपारीचा प्रस्ताव चार महिने प्रांताधिकार्‍यांच्या टेबलावर धुळखात पडून होता. आमदारांच्या राजकीय दबावातून तो फेटाळून लावला. चावला कटात जाधव याचाही सहभाग आहे.

यापूर्वी जाधव याने आपल्या टोळीसह झिंजे यांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. त्याचेही सीसीटीव्ही फुटेज आहे. गुन्हा दाखल असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बंदूकधारी पोलीस संरक्षण दिले आहे. चावला सातत्याने झिंजे यांचे संरक्षण काढण्याची मागणी करत आहे. चावलाची ही मागणी कशासाठी आहे? त्याला ही मागणी कोण करायला लावत आहे? चावला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमके काय शिजले आहे? याचा सखोल तपास पोलिसांनी करावा. झिंजे यांचे संरक्षण काढून त्यांची हत्या करण्याचा कट शिजविला जात आहे. भागानगरे हत्याकांड अजूनही ताजे आहे. झिंजे यांची हत्या झाल्यास याला सर्वस्वी कोतवाली पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे संरक्षण पोलिसांनी काढू नये, अशी काँग्रेसची मागणी आहे.

गृहमंत्री फडणवीस, एसपींना भेटणार
सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे देत कटकारस्थान रचणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमवारी करणार आहे. चावला प्रकरण गंभीर आहे. शहरात पोलिसांना हाताशी धरून सर्रास खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. शहरातील राजकीय गुन्हेगारांच्या मुसया आवळून त्या उखडून टाकण्याच्या मागणीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी समक्ष भेट घेऊन मागणी करणार असल्याचे किरण काळे म्हणाले.

बार कौन्सिलला पत्र देणार 
चावला ब्लॅकमेलिंग करतो. तसे स्टेटमेंट काही लोकांनी दिले आहेत. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याने वकील असूनही कायद्याचा दुरुपयोग करत हत्या करण्याच्या प्रयत्नाचा बनाव रचला आहे. वकिली पेशावर चावला सारख्या लोकांमुळे नाहक बदनामीची वेळ येत आहे. त्याची सनद रद्द करण्याची मागणी बार कौन्सिलला पत्र देऊन करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निवडणुका कधी? CM शिंदे यांनी सांगितली महत्वाची माहिती..? महायुतीच्या फॉर्मुल्यावर मोठं वक्तव्य…

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाचे संकेत...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज! ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेर्‍यासह..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहरासह जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात...

दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, चिमुकल्या परीसह घरी परतले ‘माता-पिता’

Deepika Padukone: प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला आज (रविवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दीपिका...

एसटी महामंडळाचा ‘मोठा’ निर्णय; ‘लालपरी’ मध्ये अडचण आल्यास करा ‘हे’ काम!

मुंबई : नगर सह्याद्री:- प्रवाशांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला...