spot_img
अहमदनगरनीलेश पारनेर पुरताच...! आमदार लंके यांच्या प्रवेशाबाबत अजित पवार यांचे 'मोठे' वक्तव्य,...

नीलेश पारनेर पुरताच…! आमदार लंके यांच्या प्रवेशाबाबत अजित पवार यांचे ‘मोठे’ वक्तव्य, पहा

spot_img

बारामती । नगर सहयाद्री-
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. यावर बारामतीत माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

राजकारणात कुणालाही कुठेही जाता येतं. वास्तविक नीलेश लंकेला पक्षात मी आणलं. त्याला मनापासून आधार मी दिला. आताही विकासकामांसाठी नीलेशला मोठ्या प्रमाणावर मदत मी केलेली आहे, नीलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे. पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, कालच नीलेश माझ्याकडे आला होता. मी नीलेश सोबत चर्चा केली. त्याला काही गोष्टी समजून सांगितल्या. पण काही लोकांनी त्याच्या मनात हवा घातली आहे की, तू खासदार होशील म्हणून पण वास्तव तसं नाहीये. नीलेश पारनेरपुरता लोकप्रिय आहे.

पण बाकीच्या मतदारसंघात त्याला वाटतं तितकं सोपं नाही. मी त्याला सांगितलं होतं, तू तशा पद्धतीने वागू नको. जितकं समजून सांगणं गरजेचं आहे. तितकं मी केलेलं आहे. आता त्याचा निर्णय, असं अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पक्ष फुटला…! तर सुनाही परक्‍या वाटू लागल्‍या का?, विखे पाटलांचा शरद पवार यांना टोला

कोल्‍हार, / नगर सह्याद्री - पक्ष फुटला तर तुम्‍हाला तुमच्‍या सुनाही परक्‍या वाटू लागल्‍या...

गावठी कट्टासह तिघे जेरबंद! ‘असा’ लावला सापळा

अहमदनगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखा व पारनेर पोलिसांनी कारवाई करत गावठी कट्टासह व...

‘भीम उत्सव कार्यक्रमात धुडगूस घालणार्‍यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा’

अहमदनगर | नगर सह्याद्री क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती...

डॉ. विखे पाटील यांना निवडून आणण्याची तन-मन-धनाने काम करणार: चौधरी

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याची सर्वच...