spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: आला चिनी मांजाचा महिना! झटपट छापे टाका... प्रशासक कठोर...

Ahmednagar News Today: आला चिनी मांजाचा महिना! झटपट छापे टाका… प्रशासक कठोर होतील का?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

ये रे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे संक्रात जवळ आल्यानंतर प्रशासनाला चिनी मांजा आठवतो आणि कारवायांचे कागदपत्र नाचविले जातात. मात्र यामुळे पशू-पक्षांसह मनुष्यांचे होणार्‍या नुकसानीकडे डोळेझाक केली जाते.

जानेवारी महिना उजाडला की आकाशात पतंगांची गर्दी व्हायला सुरूवात होते. पतंग उडविण्यास कोणाचाही विरोध नसला तरी त्यातून निर्माण झालेल्या जिवघेण्या वृत्तीने अनेकांचे धाबे दणाणतात. पतंगांच्या कापाकापीच्या स्पर्धेत धारधार मांजा अवतरला आणि त्यात अधिक जीवघेणा म्हणून चिनी मांजाकडे पाहिले जाते. पशू, पक्षी, मनुष्य यांच्या जीवाबरोबरच तो प्रदुषणासही घातक आहे. चिनी मांजा वापरू नये, असे आवाहन महापालिकेतर्फेसातत्याने करण्यात येते. मात्र केवळ कागदी आवाहन करून यावर आळा बसत नाही, हे वारंवार दिसून आले आहे.

चिनी मांजाचा साठा दोन महिने अगोदरच केला जातो. छापे पडू शकतात, यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे माहीत असतानाही ‘कापाकापी’चा आनंद मिळावा म्हणून या मांजाचा भरमसाठ साठा केला जातो. महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे याची पडताळणी दोन महिने अगोदरच सुरू होणे आवश्यक असते. मात्र जानेवारी उजाडल्यानंतर महापालिकेला जाग येते. यातही एखाद-दुसरा कोणी जखमी झाल्यानंतर महापालिकेची पथके ठिकठिकाणी छापेमारीचे ‘कर्तव्य’ पार पाडतात. आजपर्यंत वाहनधारक, लहान मुले, महिला यांना या मांजाचा फटका बसला आहे.

वाहन धारकांसाठी हा मांजा म्हणजे मोठा धोका आहे. कधी गळा, डोळा वा अन्य अवयांना हा मांजा आवळेल, काही सांगता येत नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. दरवर्षी होणार्‍या या घटनांकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. केवळ मानव जात नव्हे तर पशू, पक्षांसाठीही हा मांजा तर अक्षरशः जीवघेणा ठरत आहे. अनेक पक्षी मांजात अडकल्याने जीव गमावून बसतात. काही मांजात अडकल्याने त्यातून सुटका करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. पक्षी मित्र संघटनांकडून याकडे वारंवार लक्ष वेधले जात असले तरी त्याची दखल घेतली जात नाही.

प्रशासक कठोरहोतील का?
चिनी मांजामुळे होणारे प्रकार टाळण्यासाठी आणि चिनी मांजाचा वापर पूर्णतः थांबविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी कठोर परिश्रम घेत नसल्याचे दरवर्षीच्या अनुभवातून समोर आले आहे. चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पथकावर राजकीय दबाव येत असल्याचीही वारंवार चर्चा होते. त्यामुळे आता महापालिकेत प्रशासक असल्याने ते याबाबत किती कठोर होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

गणेशोत्सव: कार्यकर्ता घडविणारा अखंड कारखाना राहिलाय का!

समाजकारण-राजकारणाचे बाळकडू मिळणारा मंडप जुगारी अड्डा अन् गुंड- मवाल्यांच्या ताब्यात गेल्याचं बाप्पाला दु:ख! ‘जय...

अहमदनगर जिल्हा बँकेत मोठी नोकर भरती; ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु…

अहमदनगर / नगर सह्याद्री - जिल्हा सहकारी बँकेत संचालक मंडळाच्या मान्यतेने सुमारे 700 पदांसाठी...

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला सोलापूर | नगर सह्याद्री स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा...

विधानसभा निवडणूक; नव्या सर्व्हेच्या अंदाजाने मविआची चिंता वाढली; काय आहे अंदाज पहा

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. यंदा कुणाची...