spot_img
अहमदनगरAhmednagar:राक्षसवाडीत हैवानी प्रकार!! रक्ताच्या थारोळ्यात पडली, जोरजोरात ओरडली, त्याने तिला...

Ahmednagar:राक्षसवाडीत हैवानी प्रकार!! रक्ताच्या थारोळ्यात पडली, जोरजोरात ओरडली, त्याने तिला…

spot_img

कर्जत। नगर सहयाद्री
तालुक्यातील राक्षसवाडी येथे एका तरुणाने अल्पवयीन युवतीवर धारदार चाकूने हल्ला करून निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

प्रतीक लक्ष्मण काळे (वय-२२, रा. राक्षसबाडी बुद्रुक, ता.कर्जत) असे हल्ला करणार्‍या संशयिताचे नाव आहे. तर श्रावणी मोहन पाटोळे (१८, म्हसेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

श्रावणीचे आजोळ असलेल्या राक्षसवाडी बटुक येथे श्रावणी राहून कर्जत येथे बारावीच्या वर्गात शिकत होती. प्रतीक काळे याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. बारावीचा सराव पेपर दिल्यानंतर ती मैत्रिणीच्या समवेत तिच्या गाडीवर बसून राक्षसवाडीला आली.

प्रतीक काळे याने तिला अडवले व मी तुझ्यावर प्रेम करतो, परंतु तू का मला प्रतिसाद देत नाही, अशी विचारणा केली. विनाकारण मला त्रास देऊ नको, अन्यथा मी मामाला तुझे नाव सांगेल, असे श्रावणी म्हणताच प्रतीक यास राग आला व त्याने सोबत आणलेला धारदार चाकूने श्रावणीच्या पोटामध्ये वार केला.

हा वार एवढा जोरात होता की चाकू श्रावणीच्या पोटातून आरपार गेला आणि ती तिथेच खाली कोसळली. यावेळी झटापट देखील झाली श्रावणी जोरजोरात ओरडली. शेजारच्या वस्तीवर आवाज ऐकू गेल्यानंतर आसपासचे लोक धावत आले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रावणीला पाहिले.

यावेळी प्रतीक काळे याने त्याच चाकूने स्वतःच्या पोटावरही वार करून घेतले. दरम्यान रुग्णालयात नेण्यापूर्वीच श्रावणीचा मृत्यू झाला होता. जखमी झालेल्या प्रतिक यास नगर येथे उपचारासाठी देण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! नऊ तोळे सोने बँकेतुन सोडले, पुढे नको तेच घडले..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- एसबीआय बँकेत गहाण ठेवलेले नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने सोडून आणल्यानंतर ते...

कान्हूरच्या बैलपोळ्यातील बारबालांची नाचगाणी होणार बंद? यांनी केले ‘मोठे’आवाहन

पारनेर । नगर सहयाद्री कान्हूर पठार येथील बैलपोळ्याचा सण तसेच पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी...

पारनेर पोलिसांची बेधडक कारवाई; आर्थिक फसवणुक करणारे ‘ते’ आरोपी गजाआड

पारनेर । नगर सहयाद्री:- बनावट एटीएम कार्डचा वापर करुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीना पारनेर...

अहमदनगर: आधी गाडीवर फिरवल, नंतर लॉजवर नेलं; नर्सिंग कोर्ससाठी आलेल्या विद्यार्थिनीसोबत जे घडलं ते भयंकर!

अहमदनगर । नगर सहयाद्री नर्सिंग कोर्ससाठी आलेल्या विद्यार्थिनीला "तू माझ्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर का बोलत नाहीस,...