spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये आमदार लंके हेच किंग! पहा ग्रामपंचायत निकाल...

पारनेरमध्ये आमदार लंके हेच किंग! पहा ग्रामपंचायत निकाल…

spot_img

६ ग्रामपंचायतवर आ. लंके यांचे वर्चस्व / कान्हुर पठार प्रभाग क्रमांक दोनमधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाडाने निकाल राखीव?

शरद झावरे | नगर सह्याद्री –
पारनेर तालुयातील सात ग्रामपंचायतचे निकाल सोमवारी जाहीर झाले. सातपैकी सहा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. जामगाव ग्रामपंचायत सरपंचपदासाठी सौ. मनीषा बाळासाहेब माळी यांची बिनविरोध निवड झाली असून मनसेने खाते उघडले आहे.

पारनेर तालुक्यातील सात ग्रामपंचायत पैकी विरोली, वाडेगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी, काकणेवाडी या ५ ग्रामपंचायतीवर आमदार नीलेश लंके यांच्या गटाचा झेंडा फडकला आहे. कान्हुर पठार ग्रामपंचायतीत सरपंचपदी सौ संध्या किरण ठुबे आघाडीवर आहेत. कान्हुर पठार ग्रामपंचायत सरपंचपदासाठी सौ संध्या किरण ठुबे यांना १५२१ तर विरोधी उमेदवार रेश्मा सागर व्यवहारे यांना १४४५ मते मिळाली. प्रभाग क्रमांक दोनमधील ३०४ मते असणारे ईव्हीएम मशीन मेमरी लॉक झाल्याने तूर्त हा निकाल निवडणूक शाखेने राखीव ठेवला आहे. या ग्रामपंचायतीच्या तेरापैकी दहा जागेचा निकाल जाहीर झाला असून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे गटाला ६ व आमदार लंके यांच्या गटाला  सध्या ४ जागा मिळाल्या आहेत.

कान्हुर पठार ग्रामपंचायत  प्रभाग क्रमांक १ मध्ये सतीश विठ्ठल ठुबे (३३८), ज्ञानेश्वर बापु ठुबे (३८५), मंदा दत्तात्रय सोनवणे (३९६), प्रभाग क्रमांक ३ मध्ये श्रीकांत विठ्ठल ठुबे (३४०), सौ सुनिता ज्ञानेश्वर गायके (३३७), प्रभाग क्रमांक ४ मध्ये विशाल शंकर लोंढे (३०२), शारदा वैभव साळवे (३७९), प्रभाग क्रमांक ५ मध्ये धनंजय वसंत व्यवहारे (४२०), गंगुबाई एकनाथ तांबे (५०४), स्वप्नाली दीपक लोंढे (४७९) अशा एकूण १० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. तीन जागांचे निकाल मशीनमधील बिघडामुळे राखीव ठेवले आहेत.

वाडेगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रियंका किशोर यादव विजयी झाल्या असून प्रभाग क्रमांक १ मध्ये सुमित बाबुराव सोनवणे, शालन श्रीरंग रासकर, संगीता सुभाष सोनवणे, प्रभाग क्रमांक २ मध्ये एकनाथ देवराम शेळके, जयश्री बाळू सोनवणे, नंदिनी येशु झांबरे, प्रभाग क्रमांक ३ मध्ये शुभम प्रकाश गाडेकर, चैतन्य अमोल यादव, प्रभाग क्रमांक ४ मध्ये तुषार भगवान बोरगे, सुजित रामचंद्र गवळी, प्रियंका प्रविण शेळके विजयी झाल्या आहेत.काकडेवाडीच्या ग्रामपंचायत सरपंचपदी अशोक पाराजू वाळुंज ६१४ मते मिळवून विजयी झाले. विरोधी उमेदवार जयवंत तुकाराम वाळुंज यांना ४८९ मते मिळाली. विरोली ग्रामपंचायत सरपंचपदासाठी शोभा उत्तम गाडगे विजयी झाल्या. त्यांना ४१३ मते मिळाली. मीनाक्षी सावकार बुचडे (३४९), माजी सरपंच प्रभाती शंकर मोरे (३०) यांचा त्यांनी पराभव केला. यादववाडी ग्रामपंचायत सरपंचपदी राजेंद्र बाळू शेळके विजयी झाले असून ३९३ मते मिळाली आहेत. जालिंदर एकनाथ शेळके यांना ३७२, अरविंद नामदेव यादव यांना ३४८ मते मिळाली. मावळेवाडी सरपंचपदी आमदार नीलेश लंके गटाच्या कल्याणी कांतीलाल भोसले ४०० मते मिळून विजयी झाल्या. रवीना सुरेश पठारे यांना ३१३ मते मिळाली आहेत.

बिघडलेल्या मशीनचा फैसला निवडणूक आयोग देणार
कान्हूर पठार येथे प्रभाग क्रमांक २ ची ईव्हीएम मशीन मेमरी दाखवत नसल्याने ३०५ मतांची मतमोजणी करण्यास अडथळा आला. यासंबंधी तहसीलदार गायत्री सौंदाणे, नायब तहसीलदार गणेश आढारी यांनी अहमदनगर निवडणूक शाखेशी संपर्क करून याची माहिती दिली. त्यामुळे तूर्त कान्हुर पठार सरपंचपदाचा व ग्रामपंचायत सदस्यांचा निकाल राखीव आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये ठुबेमळा, टेकाडेमळा, नवले मळा, झापवस्ती यांचा समावेश आहे. सरपंचपदाचा निर्णय या मतमोजणीनंतर जाहीर होणार आहे. बिघडलेल्या या मशीनचा फैसला आता निवडणूक आयोगाकडे दिला आहे.

  • कान्हूर पठारमधील सरपंचपदाचा मानकरी
    कान्हूर पठार ग्रामपंचायत सरपंच पदासाठी संध्या किरण ठुबे १९४५ तर रेश्मा सागर व्यवहारे १८१३ ( पराभव) मते पडली. यात संध्या किरण ठुबे १३१ मतांनी विजयी झाल्या. या निवडणुकीत
    आमदार निलेश लंके गटाने सरपंच पदासह ७ तर आझाद ठुबे गटाने ७ जागा पटकावल्या.
    प्रभाग क्रमांक २ मध्ये लंके गटाला २ तर आझाद ठुबे गट १ जागा मिळाली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...