spot_img
महाराष्ट्रमला तडीपार करायचा गृहमंत्र्यांचा डाव, आता आम्ही २४ तारखेला... मनोज जरांगेंचा एल्गार

मला तडीपार करायचा गृहमंत्र्यांचा डाव, आता आम्ही २४ तारखेला… मनोज जरांगेंचा एल्गार

spot_img

जालना / नगर सह्याद्री : मराठा आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद मेळाव्यास प्रचंड गर्दी जमत आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे.

ते म्हणाले, मला रात्री माहिती मिळाली की, माझ्याविरोधात आणखी १० ते १५ केसेस करायच्या आणि मला तडीपार करण्याच्या ऑर्डर काढायच्या. गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचे कमी करा. तडीपार करण्याचा प्रयत्न करायचा, क्लिप व्हायरल करायची. मराठा समाज विरोधात गेला आणि आता इतर समाजही विरोधात चालला आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार केला.

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सूचक संकेत दिले. गृहमंत्र्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की, ती म्हणजे तुम्ही जेवढे माझ्या विरोधात जाल, तेवढी लोक माझ्या बाजूने उभी राहतील. मला पाठिंबा देतील. एका बाजूला म्हणायचे की, गुन्हे मागे घेतो आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा गुन्हे दाखल करायचे.

परळीसारख्या ठिकाणी ९० हजार ते एक लाख लोक सभेला होते. यावरून त्यांच्या लक्षात आले पाहिजे. हा तुमच्यासाठी खूप मोठा संकेत आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी. गृहमंत्र्यांना एवढा द्वेष असणे कामाचे नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘दलित पॅंथरचा खासदार विखे पाटील यांना जाहिर पाठिंबा’

अहमदनगर। नगर सहयाद्री- महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना महाराष्ट्रातील दलित पॅंथर संघटनेने जाहिर...

लंके प्रतिष्ठानचा दावा सपशेल खोटा; भाळवणीतील कोवीड सेंटरवर सरकारचा खर्च कोट्यवधी!,

शरदचंद्र पवार साहेब कोवीड सेंटरवर अंगणवाडी सेविका, झेडपीचा मास्तर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, नर्स, डॉक्टर...

धक्कादायक! वाडा घेऊन आलेल्या धनगराची अल्पवयीन मुलगी पळवली

कान्हूरपठार येथील धक्कादायक प्रकार | पोलीस ठाण्यात हेलपाटे मारूनही मिळेना न्याय | पारनेरमधील धनगर...

भाजप नेते शिवाजी कर्डीले यांचे खासदार विखे यांच्याबद्दल मोठे विधान, म्हणाले त्यांनी…

आदर्श लोकप्रतिनिधी, खासदार आपण दिल्लीला पाठवायचा आहे / डॉ.सुजय विखे पाटील यांचे माजी मंत्री...