spot_img
अहमदनगरइतिहास साक्षी आहे पुनरावृत्ती होणारच ! आ. लंके यांनी सांगितला इतिहास...

इतिहास साक्षी आहे पुनरावृत्ती होणारच ! आ. लंके यांनी सांगितला इतिहास…

spot_img

धनशक्तीविरोधातील लढाई जनशक्तीच्या बळावर जिंकत आलोय

शरद झावरे | नगर सह्याद्री
स्वाभिमानी जनतेचं नेतृत्व मी करत आलोय. माझ्या पारनेरकरांसह नगर दक्षिणेतील दुष्काळी तालुक्याला कोणी कसं झुलवलं आणि त्यांचा वापर कसा केला हे मी सांगण्याची गरज नाही. दक्षिणेतील जनता स्वाभिमानी आहे आणि ती कोणाखाली लाचार नक्कीच नाही. धनशक्तीचे प्रयोग एखाददुसर्‍या वेळेस यशस्वी झाले असले तरी आता या जादुगारांचे दिवस संपले आहेत.

धनशक्तीच्या विरोधातील लढाई जनशक्तीच्या बळावर मी जिंकत आलोय! या गोष्टीला खरं तर इतिहास साक्षी आहे आणि आताही त्याची पुनरावृत्ती होणारच असल्याचा निर्वाळा पारनेर – नगरचे आमदार लोकनेते निलेश लंके यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना दिला.

लोकनेते आमदार निलेश लंके हे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला ‘नगर सह्याद्री’शी विशेष मुलाखत देताना बोलत होते. समाजकारणासह राजकारण आणि एकूणच बदलत्या समिकरणांविषयी त्यांनी आपली भूमिका मांडली.
पारनेर नगर तालुयातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक पटलावर आजवर देशाच्या इतिहासात तालुयाचे नाव सुवर्ण अक्षराने अजरामर करणारे अनेक कोहिनूर हिरे या तालुयाच्या मातीने देशाला दिलेत. अत्यंत कमी कालावधीत महाराष्ट्राच्या इतिहासात जनसामान्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करता आल्याचे समाधान असल्याचे आ. लंके यांनी स्पष्ट केले. जनसामान्यांच्या मदतीने आमदार म्हणून निवडून आलो व गोरगरीब जनतेच्या आशा-आकांक्षाला नवीन सोनेरी पालवी फुटली.

सामान्य जनता व प्रशासकीय अधिकारी वर्ग यांचा समन्वय साधत विधायक मार्गाने समाजकारण कसे करायचे आणि सामान्य मायबाप जनतेच्या विविध समस्या कशा सोडवायच्या हे मी जनता दरबाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवून दिले. युवा सहकार्‍यांच्या साथीने व वयोवृद्ध मातापित्यांच्या मार्गदर्शना खाली जुन्या नव्याची सांगड घालून अभ्यासू व शिस्त पद्धती पद्धतीने वैचारिक देवाण-घेवाण करत समाजकारण करताना जन मनातील युवा हृदय सम्राट म्हणून एक वेगळे स्थान निर्माण झाले. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असल्याचेही आ. लंके यांनी स्पष्ट केले.

‘जे का रांजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’, या उक्तीप्रमाणे रंजल्या गांजल्या मध्ये देव पाहून सेवा करत आलोय. समाजाचे आपण काही देणे लागतो ही जाणिव आणि शिकवण माझ्या आई- वडिलांनी दिली. त्याच शिकवणीतून पायउतार होण्यासाठी मी छोटासा प्रयत्न करत आहे. दीनदुबळ्यांची सेवा करण्यासाठी आबालवृद्ध प्रेरित होत आहेत आणि त्याचे आचरण अनेकांनी कृतीतही आणले असून तीच मोठी खरी कमाई आहे. देशाचे भूषण पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विकासशील विचारांवर प्रेम करत असताना तालुयातील पुरोगामी विचारसरणीत बदल घडविण्याचे छोटेसे कार्य कोरोना काळात मी आणि माझ्या सवंगड्यांना करता आले.

घराणेशाहीच्या विरोधात मी सातत्याने लढत आलोय आणि माझ्या सहकार्‍यांचीही तीच धारणा आहे. स्वार्थी विचार आणि मतलबी पुढारपण न करता सामान्य जनतेला अपेक्षीत असणारे काम आम्ही करत आलो आहोत आणि यापुढच्या काळातही तेच करणार आहे. माझ्या मतदारसंघात विकासात्मक बदल कसा घडविता येईल माझ्या माता-भगीणीच्या डोयावरील हंडा कसा उतरविता येईल? माझ्या बेरोजगार तरुणांना रोजगार कसा मिळविता येईल? माझ्या माता-भगिनींना धार्मिक स्थळांची यात्रा मोफत कशी करता येईल? निराधारांना आधार कसा देता येईल? शैक्षणिक क्रीडा साहित्य क्षेत्रात माझ्या तरुण बांधवांना व्यासपीठ कसे निर्माण करून देता येईल? अधिकारी व सामान्य जनता यांचा समन्वय कसा साधता येईल? माझ्या मतदार संघातील दुष्काळी गावे कसे पाणीदार करता येतील या व या सारखी अनेक प्रश्नांवर तज्ज्ञ मार्गदर्शक व अधिकारी वर्गाचा सल्ला घेऊन, मंत्रालय पातळीवर पायाला भिंगरी बांधून दिवसाची १८ तास काम करत आलो आहे.

राजकीय वारसा व आर्थिक पाठबळ नसतानाही जनतेच्या आशीर्वादाने लोकवर्गणी जमा करत राज्याच्या विधानसभेत मला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणि जनतेने पोहचवले. तीच जनता आता नवा इतिहास घडविण्यास सज्ज झाली. सर्वसामान्य नेतृत्व तरुणांची ऊर्जा बनवून त्यांच्या साथीने परिवर्तन नक्कीच घडविणार यात शंका नाही. सार्वभौम विचाराने मतदार संघात सकारात्मक परिवर्तन घडून माझा गरीब कार्यकर्ता हा ग्रामपंचायत सेवा सोसायट्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक ठिकाणी असावा व त्याला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी कायम त्यांच्या पाठीशी नव्हे तर बरोबर राहून साथ देणार असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

अहो, आमचं ठरलंय; तुम्ही मंडळी गडबड करु नका !
सामान्यांना अभिप्रेत असणारा खासदार इथे असेल- आ. लंके
येणार्‍या लोकसभा निवडणुकीत काय करायचं आणि कोणती भूमिका घ्यायची याबाबत मी अद्यापही विचार केलेेला नाही. माझ्या उमेदवारीची चर्चा मीच बातम्यांमधून ऐकत आहे. आतापर्यंतच्या माझ्या राजकीय प्रवासात मी ज्या- ज्या भूमिका घेतल्या त्या माझ्या सवंगड्यांसोबत चर्चा करून घेतल्या. कारण मी एक फकीर आहे. माझे सवंगडी हीच माझी ताकद आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा अविष्कार सार्‍यांनीच पाहिला. आता लोकसभा निवडणुकी बाबत चर्चा झडत आहेत. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. माझ्या सवंगड्यांसह माझ्या नेत्यांकडून जो आदेश येईल त्यानुसार आमचं ठरणार आहे. यात तुम्ही पत्रकार मंडळी फार गडबड करु नका! सामान्य जनतेला अभिप्रेत असणारा खासदार नक्कीच या मतदारसंघातून निवडून आलेला दिसेल इतकेच !

विक्रमादित्य, आर. आर. आबा अन बच्चू कडू या उपाध्या उगीच मिळाल्या का?
जनतेच्या प्रश्नांवर फक्त नौटंकी करण्याचे काम मी व माझ्या सहकार्‍यांनी कधीच केले नाही. मी ज्यांना कायम माझा आणि माझ्या मतदारसंघाचा आधारवड मानत आलो त्या आदरनीय शरद पवार साहेब यांनी मला ‘विक्रमादित्य’, ‘महाराष्ट्राला मिळालेला आर. आर. आबा’ अशा उपाधी देऊन माझ्या कार्याचा गौरव केला. नगरमध्ये नवा बच्चू कडू तयार होत असल्याचे आणि हाच बच्चू कडू नगरकरांच्या गळ्यातील ताईत होणार असल्याचे भाकीत तुमच्याच ‘नगर सह्याद्री’ने व्यक्त केले होते. जनतेच्या मनाचा ठाव घ्या, तुम्हाला विदारक वास्तव समोर आल्याचे दिसेल आणि त्याचाच परिपाक येत्या निवडणुकीत दिसेल असेही आ. निलेश लंके यांनी ठणकावून सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट..! टँकरची संख्या १५० पार

अहमदनगर | नगर सह्याद्री उन्हाच्या चढत्या पार्‍याबरोबर जिल्ह्यातील तहानेचा ताण देखील वाढू लागला आहे. जिल्ह्यात...

पदाधिकारी नॉट रिचेबल? पारनेरची सेनापती बापट पतसंस्था व्हेंटीलेटरवर!

ठेवीदारांच्या रांगा | हवालदिल ठेवीदारांची केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे तक्रार | पदाधिकारी नॉट रिचेबल पारनेर |...

अमेरिकेतही डॉ. दीपक यांच्या संशोधनाला सन्मानाचा ‘दीप’

अहमदनगर | नगर सह्याद्री अमेरिकेतील व इतर देशातील आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट संशोधन संस्था यांच्यावतीने श्वसन प्रणालीमध्ये...

…म्हणून नगरमध्ये विजय महायुतीचाच होणार! खासदर विखे पाटलांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

श्रीगोंदा | नगर सह्याद्री अहिल्यानगर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, दक्षिण मतदार संघाचे उमेदवार...