spot_img
अहमदनगरAhmednagar: ऐतिहासिक विजयाचा नगर - पारनेमध्ये आनंदोत्सव !!

Ahmednagar: ऐतिहासिक विजयाचा नगर – पारनेमध्ये आनंदोत्सव !!

spot_img

सुपा, टाकळी ढोकेश्वर, निघोजमध्ये आनंदोत्सव

पारनेर। नगर सहयाद्री
रा
मनोज जरांगे पाटील यांनी जीवाची बाजी लावत मराठा आरक्षणाचा प्रश्न अखेर धसास लावलेला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची मराठा समाजाची मागणी जरांगे पाटील व सरकारमुळे पूर्ण झाली असून मनोज जरांगे यांच्यासह सरकारचे अभिनंदन होत आहे. सरकारने आरक्षणाचा अध्यादेश काढल्याने पारनेर तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला.
आमदार नीलेश लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात कार्यकर्त्यांसमवेत फटाके फोडत आपला आनंद उत्सव साजरा केला. यावेळी युवा नेते दिपक लंके, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, सभापती औटी, सभापती भूषण शेलार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, दत्ताभाऊ निवडुंगे, सत्यम निमसे, रवींद्र झावरे, भागुजी दादा झावरे, पोपट साळुंखे, बाळशिराम पायमोडे, विक्रम झावरे, पप्पू कासुटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुप्यात मराठा समाजाचा जल्लोष

गेल्या दशकापासून सुरू असलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सकल मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे लाखोंच्या संख्येने काढण्यात आलेल्या पदयात्रेला अखेर यश आले. राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले व सकल मराठा समाजात एकच जल्लोष झाला. २७ जानेवारी हा दिवस मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय झाल्याने हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.

शासनाला सात महिन्यांचा कालावधी देऊनही आरक्षण मिळाले नाही, वारंवार आंदोलने, उपोषण करून सरकारला फरक पडत नसेल तर आता मरण आले तरी बेहत्तर, आरक्षण घेऊनच मागे परतणार असल्याचे प्रतिपादन मराठी बांधवांचा शूर योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी यात्रेदरम्यान जाहीर केले होते. शनिवार सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई येथे आझाद मैदानावर उपस्थित होताच सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी सगेसोयरे यांचा आरक्षणात सामावेश केला जाईल हा अध्यादेश जारी केला. व मराठा समाजाने उभारलेल्या लढ्याला यश आले.

आरक्षणाचा अध्यादेश जारी करताच तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सुपा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बस स्थानक चौकात फाटाक्यांची आतषबाजी करत. भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. ’कोण म्हणतं देणार नाही, आरक्षण गेतल्याशिवाय राहात नाही’, ’ जय जवान, जय किसान’, ’जय भवानी, जय शिवाजी ’ आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाजाच मोठ्या संख्येने उपस्थित होता.

निघोजमध्ये मराठा समाजाचा आनंदोत्सव

मराठा एकीचा विजय असो तसेच फटाक्यांची आतषबाजी आणी जरांगे पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषना देत मराठा आरक्षणार आनंद व्यक्त करीत उपसरपंच माऊली वरखडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करीत तसेच मिठाईचे वाटप करीत आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी ग्रामस्थ तसेच शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपसरपंच माउली वरखडे यावेळी म्हणाले, गेली अनेक दिवसांपासून जरांगे हे सर्व सामान्य व्यक्तीमत्व सरकारकडे मराठा आरक्षण मिळण्यासाठी लढा देत होते. लाखोंच्या संख्येने यामध्ये आंदोलनकर्ते सहभागी होऊन सुद्धा कुठेही शांततेचा भंग न करता हे आंदोलन सुरुच होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जरांगे यांनी निरपेक्ष व निस्वार्थी वृत्तीने काम करीत मराठा समाजाचे नेतृत्व केले आहे. जरांगे हे मराठा समाजासाठी देवदूत असून मराठा समाजाच्या आरक्षणाचा फायदा हुशार विद्यार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती उपसरपंच माऊली वरखडे यांनी देत आनंद व्यक्त करीत जरांगे तसेच सरकारचे आभार मानले आहेत.

आरक्षण ळिताच नगर शहरात जल्लोष
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव मागील अनेक महिन्यांपासून लढा देत होते. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहेत. मध्यरात्री २ वाजता पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांनी ही घोषणा करताच सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.

याच पार्श्वभूमीवर कौडगाव येथे मराठा बांधवांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी मराठा बांधवानी चौकात एकत्र येत फटाके वाजवत, डीजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी असंख्य मराठा बांधव या ठिकाणी एकत्र आले होते. यावेळी महिला, तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. हातात भगवे ध्वज घेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी, आतषबाजी, आणि गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता माघार नाहीच; उलथापालथ करावीच लागेल! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला गंभीर इशारा

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चौदा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोणी दखल...

मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान ; मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा

मुंबई / नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर...

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शरद पवारांनी केले महत्वाचे विधान; केवळ चौकशी नको तर जबाबदारी स्वीकारून…

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार...